मुंबई

मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीला शिक्षक गैरहजर….. ???

दि. ८ मे रोजी भारत निर्वाचन आयोगाने प्रेस नोट जारी करत मुंबई शिक्षक मतदार संघ आणि त्याबरोबरच राज्यातील शिक्षक, पदवीधर मतदार संघांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला( Kapil Patil and Subhash Kisan More went to Delhi about changing the date of the election.). त्यानुसार या मतदारसंघांसाठी 10 जून 2024 रोजी मतदान होणार असे नमूद करण्यात आले आहे .परंतु शाळा १५ जून नंतर नियमित सुरु होणार असून सध्या बरेच शिक्षक हे सुट्टीवर गेलेले असल्यामुळे शिक्षक मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी दिल्लीत आज भारत निर्वाचन आयोगाला निवेदन दिले. निवेदनात त्यांनी बरेच शिक्षक हे सध्या त्यांच्या गावी असल्यामुळे अनेक मतदार हे मतदानापासून वंचित राहू शकतात हि वस्तुस्थिती मांडली . शिवाय या एकूण परिस्थितीचा विचार करता जूनच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुका घेण्याची विनंती हि त्यांनी आयोगाला केली आहे.दिल्लीतून महाराष्ट्रात आलेल्या निर्वाचन आयोगाच्या निरीक्षकांना शिक्षक भारतीचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी मंत्रालयात आज भेट घेऊन निवेदन दिले. 10 जूनला निवडणुका घेतल्यास मतदानावर कसा विपरीत परिणाम होऊ शकतो याबद्दलची वस्तुस्थिती त्यांच्याही निदर्शनास आणून दिली.

हे देखील वाचा

भारत निर्वाचन आयोगाकडे शिफरस…
कपिल पाटील यांनी निर्वाचन आयोगाचे राज्यातील प्रमुख असलेले मुख्य निवडणूक अधिकारी यांना निवडणुकीची तारीख बदलण्याबाबत निवेदन दिले. मतदानाच्या तारखेबद्दल गैरसमज होऊ शकत असतात हे गृहीत धरून मतदानाची तारीख शाळा सुरु झाल्यानंतर घेण्याची विनंती हि त्यांनी केली. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मतदान घेण्याबाबत त्यांनी भारत निर्वाचन आयोगाकडे 13 एप्रिल रोजी शिफरस केली होती.

निवडणूक समोर पण शिक्षक गैरहजर …
भारत निर्वाचन आयोगाने आखून दिलेल्या कार्यक्रमानुसार मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक आणि मुंबई शिक्षक या चार मतदारसंघांसाठी 10 जून 2024 रोजी मतदान होणार आहे. परंतु सध्या सर्व शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या असल्यामुळे बरेच शिक्षक कुटुंबासह आपापल्या मूळ गावी गेलेले आहेत. १५ जून ते १८ जून दरम्यान शाळा नियमितपणे सुरु होणार आहेत. त्यामुळे शिक्षक आणि पदवीधर १० जून २०२४ रोजी मतदान करण्यासाठी वेळेवर येणार कि नाहीत याविषयी आता शंका उपस्थित केली जातेय. मुंबईतील शिक्षक/पदवीधर मतदारसंघात उत्तर भारतीय मतदारही मोठ्या संख्येने आहेत. ते टीचर्स स्पेशल ट्रेनने परततील, जी १० जून २०२४रोजी गोरखपूरहून निघेल आणि ११ जून २०२४ रोजी मुंबईत पोहोचेल.

हे देखील वाचा

याआधीही २०१८ ला अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले होते…
२०१८ साली मतदानाची तारीख हि ८ जून २०१८ अशी जाहीर करण्यात आली होती, मात्र आमदार कपिल पाटील यांनी त्या साली हि भारत निर्वाचन आयोगाकडे
शिफारस केल्यानंतर त्या तारखेत बदल करून २५ जून २०१८ करण्यात आली.

१० जूनला निवडणूक घेणे हे निर्वाचन आयोगाच्या “नो व्होटर टू बी लेफ्ट बिहाइंड” या तत्वाशी विसंगत ठरेल, असे कपिल पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
याच संदर्भात कोकण आयुक्त यांनीही आज बैठक बोलवली होती. तिथेही शिक्षक भरतीचे प्रतिनिधी पी पी पाटील यांनी निवेदन देऊन मतदानाच्या तारखेत बदल करण्याची मागणी केलेली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी २० मे ला मुंबईत मतदान होणार आहे. आणि म्हणूनच इलेक्शन ड्यूटी आणि मतदानाचा हक्क बजावून नंतर शिक्षकांना गावी जाणे शक्य होणार नाही , त्यामुळेच त्यांचे कटुंबीय देखील चिंताग्रस्त परिस्थितीत आहेत. १५ जूनला शाळा सुरु होणार असून १० जूनला शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मुंबईत येणे कठीण होऊन बसले आहे. या सर्व घडामोडीनंतर मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक तारखेमध्ये बदल झाला तर कुटुंबासमवेत सुट्टीवर गेलेल्या शिक्षक मतदारांना मोठा दिलासा मिळेल तसेच सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल, असे सुभाष मोरे यांनी सांगितले आहे.

हे हि पहा

टीम लय भारी

Recent Posts

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

3 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

3 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

6 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

6 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

6 hours ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

6 hours ago