उत्तर महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंनी सगळ्या जागा सोडायच्या मान्य केलं का?”, नाशिकच्या जागेवरून संजय शिरसाटांचा संताप

नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विषय महायुतीतील तीनही पक्षांच्या आजी-माजी पालकमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा केला आहे. नाशिकवर आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी त्यांच्यात सुप्त संघर्ष चालू आहे. जागेचा तिढा सुटण्याची घटिका समीप येत असताना शाब्दिक द्वंद्व वाढले आहे. नाशिकची जागा शिवसेनेला (शिंदे गट) (Eknath Shinde) मिळायला हवी, हा नाशिककरांचा आग्रह असल्याचा दावा पालकमंत्री दादा भुसे यांनी करताच तो माजी पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी लगेचच खोडून काढला. यावरून आता ठाकरे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनीही संताप व्यक्त केला आहे.(Did Eknath Shinde agree to give up all the seats?” Sanjay Shirsat)

नाशिकच्या जागेवरचा निर्णय झालेला नाही. कोणी उड्या मारू नये, असं प्रफुल पटेल म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले, “हे कदाचित त्यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांना सांगितलं तर बरं होईल. तेथील खासदाराला डिवचण्यासाठी काही लोक आग्रही मागणी करत आहेत. तिथे शिवसेनेचा विद्यमान खासदार आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेलाच मिळायला पाहिजे, हा आमचा आग्रहच नाही तर हट्टसुद्धा आहे. म्हणून ती जागा आम्ही मिळवणार याबद्दल शंका नाही. हा आमच्या प्रतिष्ठेचाही प्रश्न झाला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तर दुसरीकडे महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाची उमेदवारांची यादी बाकी आहे. महायुतीमधील कोणताही वाद नसलेल्या जागा भाजपाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मोठे भाष्य केले आहे.या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मोठे भाष्य केले आहे.

एकनाथ शिंदेंनी सगळ्या जागा सोडायच्या मान्य केलं का?
“एकनाथ शिंदे यांनी सगळ्या जागा सोडायची मान्य केलं का? शिरुराची जागा तुम्हाला दिली आहे.आम्ही आमच्या जागा लढवू असा इशारा देत रत्नागिरीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेतील”, असंही संजय शिरसाट म्हणाले.

छत्रपती संभाजी नगरमधून कोण?
शिंदे गटाने अद्याप छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार जाहीर केलेला नाही. याबाबत ते म्हणाले, ही जागा शिवसेनेची आहे. ती आम्हाला मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणी लवकरच उमेदवार जाहीर केला जाईल. उमेदवारांची स्पर्धा असल्याने निर्णय घेणं जड जात आहे. संभाजीनगर जिल्ह्यात तीन नावांची चर्चा आहे. यात संदीपान भूमरे, जंजाळ, विनोद पाटील यांची नावे चर्चेत आहेत, असंही ते पुढे म्हणाले.

टीम लय भारी

Recent Posts

द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर उपाययोजना कराव्या; मंत्री छगन भुजबळ

नाशिक शहरातील द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी (avoid traffic) टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका…

3 hours ago

नाशिकमध्ये मतदान केंद्र प्रमुखाला धमकी; नाशकात पती-पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल,…

4 hours ago

पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…

5 hours ago

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

7 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

8 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

9 hours ago