उत्तर महाराष्ट्र

जरांगेनचा शब्द मोडीत नाशिकमध्ये वंचीतकडून करण गायकर उमेदवार

वंचित बहुजन आघाडी राज्यातील बहुतेक लोकसभा मतदारसंघात उमेदवार देत आहे. नाशिक लोकसभेत देखील वंचितचा उमेदवार जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ हा मराठा बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. सकल मराठा समाज देखील नाशिकच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. मात्र मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट केले. मराठा आंदोलनातील आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेल्या करण गायकर ( karan gaikar ) हे नाशिकच्या लोकसभेच्या रिंगणात उतरतील अशी चर्चा सुरू होती. वंचित बहुजन आघाडीने देखील नाशिकमध्ये सक्षम उमेदवार देण्याची तयारी दाखवली.(Karan Gaikar is contesting from Vanchit in Nashik, breaking Jarange’s word )

आणि मराठा आंदोलनातील पदाधिकारी यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नाशिक लोकसभेच्या रिंगणात वंचितकडून मराठा उमेदवार म्हणून करण गायकर यांना उमेदवारी देण्याचा जवळपास निश्चित करण्यात आले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. वंचित बहुजन आघाडीने सकल मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांना मैदानात उतरविण्याची तयारी केली आहे. उमेदवाराची अनौपचारिक घोषणा बाकी असल्याची माहिती वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.महायुती आणि महाविकास आघाडीला धक्का देण्याची तयारी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची अकोला येथे करण गायकर यांनी भेट घेतली असून यावेळी उभय नेत्यांमध्ये नाशिक लोकसभेच्या जागेसंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची देखील माहिती मिळत आहे. वंचिततर्फे गायकर यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे वंचित आघाडीचे महानगरप्रमुख अविनाश शिंदे यांनी सांगितले. गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा अशी ही लढाई असणार आहे, असे त्यांनी सांगितले. गरीब मराठ्यांना आरक्षणासाठी आंदोलन करावे लागते. त्या समाजाचा प्रमुख राजकीय पक्ष आणि श्रीमंत मराठा विचार करीत नाही. गरीब मराठा सत्तेत गेला पाहिजे, या भूमिकेतून वंचित हा प्रयोग करीत असून लवकरच गायकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल, असे शिंदे यांनी सांगितले.त्यामुळे आता वंचित नाशिकमध्ये मराठा कार्ड वापरून मराठा आंदोलनातील आक्रमक भूमिका घेणाऱ्या करण गायकर यांना उमेदवारी देत महाविकास आघाडी आणि महायुतीला जोरदार धक्का देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिकमध्ये करण गायकर यांचे मोठे काम
करण गायकर हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक दिवसांपासून सक्रिय आहेत. छावा क्रांतिवीर सेनेच्या माध्यमातून एक मोठी तरुणांची फळी करण गायकर यांच्या मागे असल्यास देखील पाहायला मिळते. महायुतीकडून मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू असताना करण गायकर यांनी छगन भुजबळ यांना उमेदवारी देऊ नये अन्यथा राज्यातील ४८ जागांवर महायुतीला त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशी देखील भूमिका घेतली होती. मात्र वंचित बहुजन आघाडीकडून करण गायकर हे स्वतः इच्छुक असल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला होता. गेल्या १५ वर्षांपासून आपण मराठा समाजासह, शेतकरी, कामगारांच्या न्याय हक्कासाठी मी लढा देत आहे. अनेक गुन्हे अंगावर घेतले. आता वंचितची भक्कम साथ मिळणार असून मराठा, ओबीसींसह १८ पगड जातींना बरोबर घेऊन निवडणूक लढणार असल्याचे गायकर यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाची लढाई लढत असताना आंबेडकर यांनी वेळोवेळी मराठा समाजाला पाठिंबा दिला. याबद्दल गायकर यांनी त्यांचे आभार देखील मानले.

नाशिकमध्ये वंचितने कारण गायकर यांना उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजे आणि महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे या तीन मराठा उमेदवारांमुळे नाशिक लोकसभेची निवडणूक ही मराठा विरुद्ध मराठा अशी पाहायला मिळेल. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीकडून करण गायकर यांना उमेदवारी अधिकृतपणे जाहीर होते का? नाशिक लोकसभेतील राजकीय जुळवाजुळव आणि प्रामुख्याने नाशिकची लोकसभा निवडणुकी जातीय राजकारणामुळे चर्चेत असते ती मात्र यंदा कशा पद्धतीने लढवली जाईल. उमेदवारांची नेमकी रणनीती काय असेल हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.

टीम लय भारी

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

6 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

8 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

8 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

9 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

10 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

11 hours ago