उत्तर महाराष्ट्र

म्हाडाला मनपाकडून हवाय वस्तुस्थिती अहवाल

नाशिक महानगरपालिकेकडे (महाराष्ट्र हाउसिंग एंड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी) म्हाडाने शहरातील सध्यास्थितीतील माहितीचा वसुस्थितीचा अहवाल मागितला आहे. त्यादुष्टीने हा अहवाल तयार करण्यासाठी नगररचनेची धावपळ सुरु असून दहा दिवसात याबाबतची सर्व माहिती संकलीत करुन मुंबईतील म्हाडा कार्यालयाकडे सादर केला जाणार आहे.दोन वर्षापूर्वी नाशिकमध्ये म्हाडा प्रकरण घोटाळ्यावरुन चांगलेच गाजले होते. व्यावसायिकांनी सदनिका उभ्या करताना नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी काही बांधकाम व्यावसायिकांना नगररचनेने नोटीसाही धाडल्या होत्या. पुढे या प्रकरणात काहीही न आढळ्ल्याने संबंधिताना क्लीन चीट देण्यात आली. दरम्यान गेल्या महिन्यात मुंबई त नगररचेनेच्या अधिकाऱ्यांची म्हाडाच्या प्रमुखांसमवेत बैठक झाली.(MHADA wants fact report from BMC)

या बैठकीत नाशिक महापालिकेला सध्यास्थितीत म्हाडा बाबतची वस्तुस्थिती काय आहे. याची माहिती घेउन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्यात. त्यानुसार शहरात म्हाडाची किती घरे तयार आहेत, किती उपलब्ध आहेत. नवीन वर्षात किती घरे दिली जाउ शकतात. तसेच कधीपर्यत ती हातात येउ शकतील. यासह विविध प्रकारची माहिती अहवालात सादर करावी लागणार आहे. चार हजार चौरस फुटापेक्षा बांधकाम केल्यास नियमानुसार वीस टक्के सदनिका आर्थिक दूर्बल घटकांसाठी राखीव ठेवावी लागात. तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांच्यावर माजी मंत्री जितेद्र आव्हाड यांनी म्हाड्याप्रकरणी घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यामुळे म्हाडाची सर्वत्र चर्चा झाली होती. पुढे याप्रकरणी काही न आढळून आल्याने घोटाळ्याचा फुसका बार ठरल्याचे चित्र होते.त्यानुसार शहरात म्हाडाची किती घरे तयार आहेत, किती उपलब्ध आहेत. नवीन वर्षात किती घरे दिली जाउ शकतात. तसेच कधीपर्यत ती हातात येउ शकतील. यासह विविध प्रकारची माहिती अहवालात सादर करावी लागणार आहे. चार हजार चौरस फुटापेक्षा बांधकाम केल्यास नियमानुसार वीस टक्के सदनिका आर्थिक दूर्बल घटकांसाठी राखीव ठेवावी लागात. तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांच्यावर माजी मंत्री जितेद्र आव्हाड यांनी म्हाड्याप्रकरणी घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यामुळे म्हाडाची सर्वत्र चर्चा झाली होती. पुढे याप्रकरणी काही न आढळून आल्याने घोटाळ्याचा फुसका बार ठरल्याचे चित्र होते.

म्हाडाने नाशिक महापालिकेकडे सध्यास्थितीतील माहिती मागितली आहे. गेल्या महिन्यात मुंबई येथे बैठक झाली असता ही मागणी करण्यात आली. दहा दिवसापर्यत अहवाल तयार करुन म्हाडाला सादर केला जाईल.
हर्षल बाविस्कर, उपसंचालक, नगररचना, मनपा

टीम लय भारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

1 day ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

2 days ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago