उत्तर महाराष्ट्र

नाशिक मनपाने केली १२ दिवसात तब्बल १३ कोटींची वसुली

पंधराव्या वित्त आयोगाचा निधी मिळवण्यासाठी महापालिकांना उत्पन्नात वाढ करणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने महापालिकेकडून (Nashik Municipal Corporation) मालमत्ता कर सवलत योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत बारा दिवसात तब्बल १२ कोटी ९५ लाख रुपये मालमत्ता कर वसुल झाला असून, मागील वर्षाच्या तुलनेत तीन कोटी रुपयांनी अधिक वसुली झाली आहे. मालमत्ता कर वसूल करण्यासाठी महापालिकेने एप्रिल, मे व जून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सवलत योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत एप्रिल महिन्यात मालमत्ता कर एकरकमी अदा केल्यास आठ टक्के सूट आहे. मे महिन्यात कर अदा केल्यास सहा टक्के, तर जून महिन्यात तीन टक्के सवलत आहे.(Nashik Municipal Corporation recovers Rs 13 crore in 12 days )

सौरऊर्जा प्रकल्प, सोलर वॉटर हिटर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाण्याचा पुनर्वापर करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना पाच टक्के सवलत आहे. गृहनिर्माण संस्था किंवा निवासी क्षेत्रांमध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन कार्यान्वित असल्यास दोन टक्के अतिरिक्त सवलत आहे. त्याचबरोबर ई-पेमेंट किंवा डिजिटल पेमेंट वापरात आणल्यास पाच टक्के किंवा तीन हजार रुपये यापैकी कमी असेल ती रक्कम देय आहे. मागील आर्थिक वर्षातदेखील महापालिकेकडून सवलत योजना लागू करण्यात आली.त्याअनुषंगाने महापालिकेकडून उत्पन्नात वाढ करताना मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मालमत्ता कर वसूल करण्यासाठी महापालिकेने एप्रिल, मे व जून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सवलत योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत एप्रिल महिन्यात मालमत्ता कर एकरकमी अदा केल्यास आठ टक्के सूट आहे. त्याचबरोबर ई-पेमेंट किंवा डिजिटल पेमेंट वापरात आणल्यास पाच टक्के किंवा तीन हजार रुपये यापैकी कमी असेल ती रक्कम देय आहे. मागील आर्थिक वर्षातदेखील महापालिकेकडून सवलत योजना लागू करण्यात आली. त्याचबरोबर ई-पेमेंट किंवा डिजिटल पेमेंट वापरात आणल्यास पाच टक्के किंवा तीन हजार रुपये यापैकी कमी असेल ती रक्कम देय आहे. मागील आर्थिक वर्षातदेखील महापालिकेकडून सवलत योजना लागू करण्यात आली.

वर्षभरात २०५ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल झाला. विक्रमी कर वसूल झाल्याने महापालिकेकडून कर सवलत योजना लागू करताना सवलतीचे टक्केदेखील वाढविले. त्याचा परिणाम म्हणून १ एप्रिल ते १२ एप्रिल या दरम्यान बार कोटी ९५ लाख ९० हजार ७८५ रुपये वसूल झाले आहेत.
विवेक भदाणे , कर उपायुक्त,नाशिक मनपा

टीम लय भारी

Recent Posts

द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर उपाययोजना कराव्या; मंत्री छगन भुजबळ

नाशिक शहरातील द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी (avoid traffic) टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका…

6 hours ago

नाशिकमध्ये मतदान केंद्र प्रमुखाला धमकी; नाशकात पती-पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल,…

7 hours ago

पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…

8 hours ago

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

10 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

11 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

12 hours ago