उत्तर महाराष्ट्र

शांतिगिरी महाराजांचा ‘एकला चलो रे’ चा नारा!

नाशिकच्या राजकारणातील मोठी अपडेट समोर येत आहे. श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांचे नाव पुढे केल्याने शांतिगिरी महाराज नाराज झाले आहेत. त्यांनी एकला चलो रेचा नारा दिला आहे. पण बाबाजी भक्तगण परिवारातून महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. नाशिकच्या राजकीय आखाड्यात आता खरा कस आणि दम लागणार आहे. शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांना महायुतीकडून तिकीट मिळण्याची अपेक्षा होती. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी काल नाशिकमधून हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली. शांतिगिरी महाराज नाराज झाले. त्यांनी एकला चलो रेचा नारा (‘Ekla Chalo Re’) दिला आहे.(Shantigiri Maharaj’s slogan of ‘Ekla Chalo Re’!)

पण बाबाजी भक्तगण परिवारातून महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. या निर्णयानंतर नाशिक लोकसभा निवडणुकीत अधिक रंगत येणार आहे.
महाराज निर्णयावर ठाम नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरण्यावर शांतिगिरी महाराज ठाम आहेत. त्यांना महायुतीकडून तिकीट मिळण्याचा विश्वास होता. त्यासाठी त्यांनी प्रयत्न पण केले. हेमंत गोडसे हे नाशिक मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. नुकत्याच झालेल्या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केली. शिंदेंच्या घोषणे नंतर शांतिगिरी महाराज नाराज झाले. त्यांनी तिकीट मिळालं नाही तर अपक्ष लढणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. शांतिगिरी महाराज मविआ च्या कोणत्याही नेत्याच्या संपर्कात नसल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराजांचा मोठा भक्त परिवार
शांतिगिरी महाराज हे मुळचे नाशिक जिल्ह्यातील लाखलगाव येथील आहेत. ते वेरुळ येथील जनार्धन स्वामींच्या मठात दाखल झाले. येथेच त्यांनी विज्ञान शाखेतून पदवी घेतली. त्यानंतर ते मठाधिपती झाले. या मठाची कोट्यवधींची संपत्ती आहे. देशात 55 हून अधिक मठ आहेत. काही ठिकाणी गुरुकूल आहेत. या मठाकडे शेकडो एकर जमीन आहेत. अनेक एसयुव्ही कार आहेत. शांतिगिरी महाराजांचे छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, नाशिक, धुळे या जिल्ह्यात मोठा भक्त परिवार आहे.
महाराजांनी वर्ष 2009 मध्ये छत्रपती संभाजीनगर मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 1 लाख 48 हजारं मतं मिळाली होती. निवडणुकीत पराभवानंतर महाराज अनेक वर्षे निवडणुकीपासून दूर होते. पण आता छत्रपती संभाजीनगर ऐवजी महाराज नाशिकच्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.पण आता छत्रपती संभाजीनगर ऐवजी महाराज नाशिकच्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टीम लय भारी

Recent Posts

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

55 mins ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

1 hour ago

मधमाशी सौंदर्य खुलवते, आजार बरे करते

सदर व्हिडीओ मध्ये बिपीन जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ आपणास…

1 hour ago

मधमाशीकडून शिका बिझनेस मॅनेजमेंट

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

3 hours ago

निवडणूक कामात हलगर्जीपणा करणारे नाशिकचे दोन पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस आयुक्त संदीप कर्णिक

निवडणुकीच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना (Two policemen suspended) पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (…

3 hours ago

सप्तशृंगी गडावर जाणारी टॅम्पो ट्रॅव्हलर बस जळून खाक; सुदैवाने जीवितहानी नाही

शिर्डी येथून भाविकांना घेवून सप्तशृंगी गडाकडे दर्शनासाठी जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला घाट रस्त्यावरील गणपती टेकडीजवळ काल…

4 hours ago