31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशांतिगिरी महाराजांचा ‘एकला चलो रे’ चा नारा!

शांतिगिरी महाराजांचा ‘एकला चलो रे’ चा नारा!

नाशिकच्या राजकारणातील मोठी अपडेट समोर येत आहे. श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांचे नाव पुढे केल्याने शांतिगिरी महाराज नाराज झाले आहेत. त्यांनी एकला चलो रेचा नारा दिला आहे. पण बाबाजी भक्तगण परिवारातून महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. नाशिकच्या राजकीय आखाड्यात आता खरा कस आणि दम लागणार आहे. शांतिगिरी महाराज यांना महायुतीकडून तिकीट मिळण्याची अपेक्षा होती. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी काल नाशिकमधून हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली. शांतिगिरी महाराज नाराज झाले. त्यांनी एकला चलो रेचा नारा दिला आहे.

नाशिकच्या राजकारणातील मोठी अपडेट समोर येत आहे. श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांचे नाव पुढे केल्याने शांतिगिरी महाराज नाराज झाले आहेत. त्यांनी एकला चलो रेचा नारा दिला आहे. पण बाबाजी भक्तगण परिवारातून महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. नाशिकच्या राजकीय आखाड्यात आता खरा कस आणि दम लागणार आहे. शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांना महायुतीकडून तिकीट मिळण्याची अपेक्षा होती. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी काल नाशिकमधून हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली. शांतिगिरी महाराज नाराज झाले. त्यांनी एकला चलो रेचा नारा (‘Ekla Chalo Re’) दिला आहे.(Shantigiri Maharaj’s slogan of ‘Ekla Chalo Re’!)

पण बाबाजी भक्तगण परिवारातून महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. या निर्णयानंतर नाशिक लोकसभा निवडणुकीत अधिक रंगत येणार आहे.
महाराज निर्णयावर ठाम नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरण्यावर शांतिगिरी महाराज ठाम आहेत. त्यांना महायुतीकडून तिकीट मिळण्याचा विश्वास होता. त्यासाठी त्यांनी प्रयत्न पण केले. हेमंत गोडसे हे नाशिक मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. नुकत्याच झालेल्या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केली. शिंदेंच्या घोषणे नंतर शांतिगिरी महाराज नाराज झाले. त्यांनी तिकीट मिळालं नाही तर अपक्ष लढणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. शांतिगिरी महाराज मविआ च्या कोणत्याही नेत्याच्या संपर्कात नसल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराजांचा मोठा भक्त परिवार
शांतिगिरी महाराज हे मुळचे नाशिक जिल्ह्यातील लाखलगाव येथील आहेत. ते वेरुळ येथील जनार्धन स्वामींच्या मठात दाखल झाले. येथेच त्यांनी विज्ञान शाखेतून पदवी घेतली. त्यानंतर ते मठाधिपती झाले. या मठाची कोट्यवधींची संपत्ती आहे. देशात 55 हून अधिक मठ आहेत. काही ठिकाणी गुरुकूल आहेत. या मठाकडे शेकडो एकर जमीन आहेत. अनेक एसयुव्ही कार आहेत. शांतिगिरी महाराजांचे छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, नाशिक, धुळे या जिल्ह्यात मोठा भक्त परिवार आहे.
महाराजांनी वर्ष 2009 मध्ये छत्रपती संभाजीनगर मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 1 लाख 48 हजारं मतं मिळाली होती. निवडणुकीत पराभवानंतर महाराज अनेक वर्षे निवडणुकीपासून दूर होते. पण आता छत्रपती संभाजीनगर ऐवजी महाराज नाशिकच्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.पण आता छत्रपती संभाजीनगर ऐवजी महाराज नाशिकच्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी