उत्तर महाराष्ट्र

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi) निवडून देणे ही काळाची गरज असून नाशकातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau waje) यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी कंबर कसावी,असे आवाहान माजी आमदार वसंत गिते ( Vasant Geete) यांनी केले. नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ इंडिया आघाडीच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी त्रंबक तालुक्यातील ठाणापाडा जिल्हा परिषद गटातील सर्व गाव,वाड्या आणि पाड्यांना भेटी दिल्या.(The need of the hour is for the India-led government to come to power in the country: Former MLA Vasant Geete)

तेथील नागरिकांची विचारपूस करून त्या परिसरातील समस्या व प्रलंबित प्रश्नांची माहिती जाणून घेतली त्यावेळी गिते बोलत होते. राजाभाऊ वाजे यांना सर्वत्र पोषक वातावरण असल्याचे दौऱ्यात आढळून आले.आदिवासी तालुक्यांचा विकास केवळ इंडिया आघाडीच करू शकते हे लक्षात घ्या आणि राजाभाऊ वाजे यांच्या मशाल चिन्हावर शिक्का मारून त्यांना दीनदुबळ्यांची सेवा करण्यासाठी दिल्लीला पाठवा, असे आवाहनही गिते केले. इंडिया आघाडी आदिवासी बांधव आणि वंचित घटकांच्या पाठीशी सातत्याने खंबीरपणे उभी राहिली आहे.भाजपा प्रणित केंद्र सरकारने आदिवासी बांधवांना केवळ आश्वासनेच दिली.आता मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचून केंद्रात परिवर्तन घडविण्याची संधी जनतेने गमावू नये,असे इगतपुरी-त्रंबकचे आमदार हिरामण खोसकर यांनी. आपल्या मनोगतात सांगितले.

दौऱ्यात जिल्हाप्रमुख निवृर्ती जाधव,निवृत्ती लांबे, तालुकाप्रमुख समाधान बोडके, जाधव,नितीन लाखन, विधानसभा संघटक संपत चव्हाण,तालुका समन्वयक देविदास जाधव,तालुका पदाधिकारी,सुनिल भोये,विठ्ठल भोये,अंबादास महाडी,संतोष जाधव,महेद्र गावित,हारीजात गावित,धर्मराज खाले,चितामण गुजार आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

टीम लय भारी

Recent Posts

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

1 min ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

24 mins ago

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

16 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

16 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

17 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

17 hours ago