उत्तर महाराष्ट्र

यामुळे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादित नाराजी !

शरद पवार (sharad pawar) यांच्याशी फारकत घेऊन राष्ट्रवादी पक्षच ताब्यात घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) आज अस्तित्वाचे युद्ध लढत आहेत. अजित पवार महायुतीत गेले खरे परंतु जागावाटपाच्या तहात बऱ्याच महत्वाच्या जागा गमवाव्या लागल्या आहेत. ओपिनिअन पोलनुसार तर त्यांना बारामतीच्या जागेसह चारही जागा जिंकण्याची शक्यता नाहीय. त्यातच नाशिकची आणि साताऱ्याची जागाही गेल्याने राष्ट्रवादीत अजित पवारांविरोधात नाराजीचा सूर उमटू लागल्याचे वृत्त आहे . साताऱ्याची जागा राष्ट्रवादीतून उदयनराजे भोसले लढवत होते. त्यांनी अंतर्गत राजकारणातून पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनाम देत भाजपात प्रवेश केला होता. यानंतरच्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा पराभव झाला होता. तर राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता. तरीही साताऱ्याची जागा राष्ट्रवादीने भाजपला सोडली .(This has angered the nationalists of the Ajit Pawar faction)

त्यापूर्वीच्या जागावाटपांच्या चर्चांत गडचिरोली, परभणी सारख्या जागा अजित पवारांनी महायुतीच्या दबावाला बळी पडून सोडल्याची नाराजी आहे. तर साताऱ्याबरोबरच नाशिकमध्येही अजित पवार कमी पडले अशी भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये बळ धरू लागली आहे. दुसरीकडे अजित पवार, तटकरे आणि पटेल हे तिघेच निर्णय घेतात, कोणाला विचारात घेत नाहीत असा सूरही काही जणांमध्ये आहे. नाशिकच्या उमेदवारीसाठी छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना फोन केला होता. दोघांनीही मोदी आणि अमित शाह यांनी भुजबळांना नाशिकमध्ये उमेदवारी द्या असे सांगितल्याचे म्हटले होते. परंतू, याला १५ दिवस लोटले तरी उमेदवारी जाहीर होत नाही, यामुळे नाराज होऊन भुजबळांनीच दावा मागे घेत असल्याचे जाहीर केले.

नाशिक मागण्यात देखील पवार कमी पडल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे शिंदे गटातही नाराजी असल्याचे बोलले जात आहे. शिंदेंचे मंत्री सावंत यांनी काल अजित पवारांसमोरच भर व्यासपीठावर एकेक जागा कमी होऊ लागल्या तर शांत बसणार नाही, असा इशारा दिला होता. या सगळ्यात राष्ट्रवादीची चांगलीच फरपट झालेली दिसत आहे. राष्ट्रवादीला चारच जागा घेऊन लढावे लागत आहे. त्यात देखील दोन उमेदवार उमेदवारीसाठी आयात केलेले आहेत. अजित पवारांनी बारामतीत निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने पत्नीला निवडून आणण्यासाठी सर्व ताकद तिकडेच खर्च करावी लागत आहे. कारण अजित पवारांचे कुटुंब एकीकडे आणि शरद पवार व अन्य पवार फॅमिली दुसरीकडे असे झाले आहे. यामुळे सर्व पवार कुटुंबीय अजित पवारांच्या विरोधात प्रचार करू लागले आहेत. चुलते बाजुलाच इथे सख्खेही अजित पवारांच्या विरोधात मत मांडत प्रचार करत आहेत. आता अजित पवार या सगळ्याला पुरून उरणार की अस्तित्व गमावणार यावर येत्या ४ जूनलाच प्रकाश पडणार आहे .

टीम लय भारी

Recent Posts

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

1 hour ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

2 hours ago

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

4 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

4 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

6 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

6 hours ago