उत्तर महाराष्ट्र

दिंडोरीत माकपा लढणार, बड्या पक्षांना फटका बसणार …

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर माकपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, ही जागा माकपाला ( CPI(M) ) सोडा अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहा, असा इशाराच माकपाचे नेते डॉ. डी. एल. कराड आणि माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना दिला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी २० एप्रिलला ओझर येथे माकप नेते डॉ. डी. एल. कराड आणि माजी आमदार जीवा पांडू गावित यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला,(THE CPI(M) will contest in Dindori, which will hurt the big parties)

मात्र माकपचे नेते ऐकण्यास तयार नसल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या समोरच यासंदर्भात तोडगा काढण्याचे ठरले. दिंडोरीत शरद पवार गटाच्या वतीने भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली असून, ही जागा माकपाला हवी होती.दिंडोरीत शरद पवार गटाच्या वतीने भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली असून, ही जागा माकपाला हवी होती . विधानसभेत संधी देऊ जयंत पाटील यांनी दिंडोरीतील जागेसंदर्भात तोडगा काढण्यासाठी विधानसभा निवडणुकीत माकपाला अधिक संधी देऊ असे सांगितले, मात्र आधी लोकसभेबाबत बोला, असा माकपाचा पवित्रा होता. अखेरीस शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई किंवा पुणे येथे बैठक घेऊ, असे पाटील यांनी सांगितले.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाच्या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भास्कर भगरे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. या मतदार संघात भाजपच्या वतीने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांना यापूर्वीच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या मतदार संघात महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता होती. अखेर शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भास्कर भगरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. दिंडोरी लोकसभेची जागाही महाविकास आघाडीकडून माकपने देखील लढवण्याची तयारी दाखवली होती. मात्र अखेर महाविकास आघाडीकडून भास्कर भगरे आहे. त्यामुळे या मतदार संघात आता महायुतीकडून डॉ भारती पवार आणि महाविकास आघाडी कडून भास्कर भगरे अशी लढत पाहायला मिळणार आहे . दिंडोरी लोकसभेची जागाही महाविकास आघाडीकडून माकपने देखील लढवण्याची तयारी दाखवली होती. मात्र अखेर महाविकास आघाडीकडून भास्कर भगरे आहे.

टीम लय भारी

Recent Posts

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, कॅल्शियम,फायबर, मॅग्नेशियम,…

28 mins ago

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

2 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

3 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

4 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

5 hours ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

19 hours ago