उत्तर महाराष्ट्र

नाशिकच्या नो-पार्किंग’मधील वाहनांकडे ‘कानाडोळा’! सोयीनुसार वाहनांची टोईंग

नाशिक  शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या आठवडाभरापासून वाहनांच्या टोईंगची (Towing) कारवाई सुरू झालेली आहे. मात्र असे असतानाही शहरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या व नो-पार्किंगचा (vehicles in no-parking) फलक असतानाही त्याठिकाणी दिवसभर पार्क केल्या जाणाऱ्या वाहनांची टोईग (Towing) करण्याकडे कानाडोळा केला जात आहे. तर दुसरीकडे ठराविक ठिकाणीच टोईगची कारवाई होते आहे. त्यामुळे या उद्देशासाठी टोईंग सुरू करण्यात आली, तो साध्य होत नसल्याने वाहतूक कोंडी ची समस्या सुटलेली नाही. महाराष्ट्र दिनापासून शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये टोईंग (Towing) कारवाई सुरू करण्यात आली आहे.(‘Turn a blind eye’ to vehicles in no-parking! Towing of vehicles as per convenience)

नो-पार्किंगमधील वाहने आणि रस्त्यालगत वाहतुकील अडथळा ठरणाऱ्या वाहनांची टोईंग होत असल्याने बेशिस्त वाहनचालकांना दणका बसला आहे. मात्र, टोईंग करताना वाहतूक पोलीस व टोईंग कर्मचाऱ्यांकडून ठराविक रस्त्यांवरील नो- पार्किंगमधील वाहनांचीच टोईग केली जात आहे. प्रत्यक्षात शहरात बहुतांशी ठिकाणी नो-पार्किंगचे फलक लावलेले असताना, तेथील वाहनांची मात्र टोईंग होताना दिसत नाही. त्यामुळे त्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी कों ची समस्या जैसे थे आहे.प्रत्यक्षात शहरात बहुतांशी ठिकाणी नो-पार्किंगचे फलक लावलेले असताना, तेथील वाहनांची मात्र टोईंग होताना दिसत नाही. त्यामुळे त्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी कों ची समस्या जैसे थे आहे.

टोईंग ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून मेळा बसस्थानक, सिटी सेंटर मॉल, टिळकवाडी रोड येथील नो-पार्किंगमधील दुचाक्या-चारचाकी वाहनांची टोईंग केली जाते. तर, एम.जी. रोडवरील नो- पार्किंगमध्ये चारचाकी वाहने असताना त्यांची टोईंग होत नाही. तर, नो-पार्किंग पट्ट्याबाहेरील दुचाक्यांची मात्र टोईंग केली जाते. त्याचप्रमाणे, सार्वजनिक वाचनालयाकडून सांगली बँक सिग्नलकडे येणाऱ्या रस्त्याच्या कडेला नो- पार्किंगचा फलक लावण्यात आलेला आहे. असे असताना त्याठिकाणी सर्रासपणे चारचाकी वाहने पार्क केल्या जातात. मात्र, या वाहनांची टोईंग केली जात नाही. कॉलेजरोडवरही तशीच परिस्थिती आहे. यामुळे टोईंग वाहनावरील अंमलदार व कर्मचाऱ्यांकडून जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात असल्याचे बोलले जाते आहे.शरणपूर रोडवरील टिळकवाडी सिग्नल तर कुलकर्णी गार्डन रस्त्यावर मनपासमोर अनेक बँका आहेत. याठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे वाहने रस्त्यावर पार्क केली जातात. येथे एकापाठोपाठ एक वाहनांची टोईंग केली जाते.त्यामुळे सतत कारवाई होत असते .येथे एकापाठोपाठ एक वाहनांची टोईंग केली जाते.त्यामुळे सतत कारवाई होत असते . याचप्रमाणे, टिळकवाडी सिग्नलकडून जलतरण तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहनांची टोईंग होते.

टीम लय भारी

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

2 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

2 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

3 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

4 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

5 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

6 hours ago