महाराष्ट्र

मराठा आंदोलनाविरोधात ओबीसींचेही आंदोलन !

टीम लय भारी

मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने येत्या 8 डिसेंबर रोजी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाविरोधात ओबीसींकडूनही आता आंदोलन करण्यात येणार आहे ( OBC will agitated against Maratha ).

ओबीसी नेते व माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी आज पत्रकार परिषदेत हा इशारा दिला आहे. ओबीसींच्या वतीने 7 डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात येणार होते. परंतु या आंदोलनाला परवानगी देण्यात आली नाही. मुख्यमंत्र्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु मराठा समाज आंदोलन करणार असेल, तर त्या विरोधात आम्हीही आंदोलन करू अशी भूमिका शेंडगे यांनी मांडली आहे ( Prakash Shendge attacks on Maratha leader ).

येत्या 5 डिसेंबर रोजी ओबीसी नेत्यांची औरंगाबाद येथे बैठक आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

बाळासाहेब थोरातांच्या ‘या’ निर्णयाचा 29 लाख लोकांना मिळाला लाभ

Maratha Kranti Morcha : मराठा मोर्चाचा सरकारला 2 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम, अन्यथा सर्वपक्षीय आमदारांना चोळीबांगडी आणि पवारांच्या घरावर मोर्चा काढणार

Maratha Reservation : मराठा आरक्षण सुनावणीसाठी घटनापीठ स्थापनेसाठी राज्य सरकारचा चौथा अर्ज

उदयनराजे व संभाजीराजे असे दोन राजे मराठा समाजाबरोबर आहेत. दोघेही खासदार आहेत. या दोघांनी नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी, अन् संसदेत घटनादुरूस्ती करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, असाही सल्ला शेंडगे यांनी दिला ( Udayanraje and Sambhajiraje should meet Narendra Modi ).

मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. परंतु त्यांनी ओबीसींच्या ताटातील हिसकावून घेऊ नये. मुळातच मराठा समाजाला अगोदर दिलेले आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, असे आम्ही सांगितले होते. पण त्यावेळी आमचे कुणी ऐकले नाही, असाही टोला शेंडगे यांनी भाजपला लगावला.

गायकवाड समितीच्या अहवालानुसार आम्ही मागासवर्गीय आहोत, असे मराठा समाजाचे नेते सांगत आहेत. हा अहवाल कुठे आहे. तो जाहीर करा, असे आव्हान शेंडगे यांनी दिले. मुळात हा अहवाल विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडलेला नाही. त्यावर आमदारांना मते मांडण्याची संधी दिलेली नाही. मागील भाजप सरकारने चुकीच्या पद्धतीने मराठा आरक्षणाची अंमलबजावणी केल्याचे ते म्हणाले.

ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. पण या सरकारने ओबीसी तसेच धनगरांना काहीही दिलेले नाही.

आम्हाला संघर्ष करायचा नव्हता. पण मराठा समाजाचे नेते टोकाची भूमिका घेत आहेत. ओबीसींच्या हक्काचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे, असेही शेंडगे म्हणाले.

तुषार खरात

Recent Posts

मशरूम खाण्याचे फायदे

मशरूममध्ये (mushrooms ) अनेक महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम,…

53 mins ago

पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान

पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात (gold shop) सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली…

2 hours ago

काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला; के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…

3 hours ago

दिव्यांग सशक्तीकरणासाठी मोदींच्या हमीवर विश्वास; विकास शर्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…

3 hours ago

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

4 hours ago

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

4 hours ago