महाराष्ट्र

पार्थ पवारांनी रोहित पवारांचा आदर्श घ्यावा

टीम लय भारी

मुंबई :  राजकारणात पुढे जाण्याची पार्थ पवार यांची महत्वकांक्षा आहे. पण ते अद्याप बालकाप्रमाणेच वागतात. रचनात्मक कामात कुठेही पुढाकार नाही. राजकीय बांधणीकडे तर बिल्कूल लक्ष नाही. पार्थ पवार यांना राजकारणात पुढे जायचे असेल तर त्यांनी रोहित पवारांचा आदर्श घ्यायला हवा अशी भावना खुद्द पार्थ यांच्या समर्थकांकडूनच व्यक्त केली जात आहे ( Parth Pawar must be learn from Rohit Pawar ).

पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतरही त्यांनी हार न मानता मतदारसंघात बांधणी करण्याकडे लक्ष द्यायला हवे होते. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे ( Parth Pawar ignores to his Maval constituency ).

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मतदारसंघात त्यांचे अनेक समर्थक तयार झाले आहेत. पण पक्षाअंतर्गत असलेल्या या समर्थकांशी ते संपर्क ठेवत नाहीत. या समर्थकांनी संपर्क साधला तर पार्थ फोन उचलत नाहीत. परत फोन करीत नाहीत. एसएमएसला उत्तरे देत नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

पार्थ पवार यांच्याकडे सागर जगताप नावाचे पीए आहेत. हे पीए अत्यंत विचित्र आहेत. पार्थ पवार यांचा कार्यकर्त्यांसोबत संपर्क झालाच नाही पाहीजे, अशी जगताप यांची कार्यपद्धत आहे.

मावळ मतदारसंघात कार्यकर्त्यांनी पार्थ यांच्या संमतीने अनेकदा कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांसाठी पार्थ पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. कार्यक्रमासाठी येण्याचे कबूल करूनही त्यांनी आयत्या वेळी कार्यक्रमाला दांड्या मारल्याचे या सूत्रांनी दिली ( Parth Pawar was absent for political programs in Maval ).

राजकारणात पार्थ पवार नवखे आहेत. पण आपल्या ‘नवशिखे’पणातून बाहेर पडण्याची त्यांची कसलीच मानसिकता नाही. त्यांचे ट्विटर सांभाळणाऱ्या व्यावसायिकांनाही ‘अक्कल’ नाही. पक्षामधील प्रमुख नेत्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासारख्या साध्या बाबींचेही अवधान त्यांना नसते.

हे सुद्धा वाचा

आमदार रोहित पवारांचा कमालीचा विनम्रपणा, मंत्रालयात चक्क व्हरांड्यात बसले

Rohit Pawar : रोहित पवारांची मतदारसंघासाठी ‘स्मार्ट’ योजना

पार्थ पवारांच्या नावाने लोकांना मदतीचा हात

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती

रोहित पवार यांनी स्वःकर्तृत्वातून आपली प्रभावी छाप जनमाणसांमध्ये पाडली आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधी त्यांनी जामखेड मतदारसंघाची मजबूत बांधणी केली होती.

सामाजिक प्रश्नांचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे. त्यांनी आपल्या चाहत्यांची मोठी फळी तयार केली आहे. ही फळी त्यांनी जाणीवपूर्वक जोपासली आहे. त्यामुळे फेसबुक, ट्विटरवर त्यांना मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत.

रोहित पवार यांचा जनसंपर्क दांडगा आहे. सामाजिक व जनतेच्या प्रश्नांमध्ये ते लक्ष घालतात. सरकारी यंत्रणेकडे पाठपुरावा करतात. रोहित पवारांकडे असलेले हे गुण पार्थ पवार यांच्याकडे बिल्कूल नाहीत.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी ही मागणी त्यांच्या राजकीय अकलेच्या व क्षमतेच्या बाहेरची आहे. तरीही त्यांनी त्यात नाक खुपसले. या मागणीसाठी ते गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटले. पण समाजातील महत्वाच्या प्रश्नावर ते असे कोणत्याच मंत्र्यांना भेटले नाहीत. मावळ मतदारसंघातील प्रश्नावर सुद्धा त्यांनी कधी सरकारी यंत्रणेकडे पाठपुरावा केला नाही, असेही या सूत्रांनी सांगितले.

स्वतःचे महत्व वाढविण्यासाठी वादग्रस्त ट्विट करण्याऐवजी त्यांनी रोहित पवारांप्रमाणे प्रभावी काम करायला हवे. किमान आपले वडील अजित पवार यांची कार्यपद्धत तरी अनुसरायला हवी, असेही या सूत्रांनी सांगितले ( Parth Pawar atleast follow his father Ajit Pawar ).

येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा
तुषार खरात

Recent Posts

नेहरू-आंबेडकरांचे संबंध परस्पर आदराचे अन् तणावाचे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या आयुष्यात दोन पातळ्यांवर लढा देत होते(The Nehru-Ambedkar relationship was one of…

46 mins ago

Teacher’s Election | ज. मो. अभ्याकरांंनी शिक्षकांचं वाटोळं केलं, शिवसेनेचा चुकीचा उमेदवार

लोकसभा निवडणूक २०२४ नुकतीच पार पडली आहे असे असले तरीही शिक्षक व पदवीधर निवडणूकांची धामधुम…

2 hours ago

मनुस्मृती वाईट, पण त्यातील श्लोक चांगले | शिक्षण मंत्री Deepak Kesarkar यांच अजब तर्कट

सदर व्हिडीओ मध्ये राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसकर इयत्ता १०वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा…

22 hours ago

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा विद्यार्थी पालकांना मोलाचा सल्ला

आज इयत्ता १०वी चा निकाल जाहीर झाला.सदर व्हिडीओ मध्ये राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसकर परीक्षेत…

22 hours ago

अजित पवार म्हणाले, सुनील टिंगरे यांचीही चौकशी होणार, कारवाई सुद्धा करू

राष्ट्रवादीकाँग्रेस पार्टीची कार्यकारिणीची बैठक आज मुंबईतील गरवारे हॉल येथे पक्षाचेराष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा…

23 hours ago

शरद पवारांवर नाराज नाही, पण सुप्रिया सुळे नोकरासारख्या वागवतात

राष्ट्रवादीकाँग्रेस पार्टीची कार्यकारिणीची बैठक आज मुंबईतील गरवारे हॉल येथे पक्षाचेराष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा…

23 hours ago