महाराष्ट्र

PFI : तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा ‘पीएफआय’ ला केले खिळखिळे

पीएफआय (PFI) संघटनेच्या विरोधात पुन्हा एकदा तपासयंत्रणा आक्रमक झाल्या आहेत. पीएफआयवर आज पुन्हा अनेक राज्यांमध्ये छापेमारी सुरू केली आहे. या संघटनेला खिळखिळे करण्याचा वीडाच तपासयंत्रणांनी उचलला आहे. दिल्ली, उत्तरप्रदेश आणि आसाममध्ये पीएफआय संघटनेच्या अनेक सदस्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आतंकवाद्यांना पैसा पुरवल्याचा आरोप या संस्थेवर आहेत. मागच्या आठवडयात देखील अनेक राज्यांमध्ये एनआयएने छापेमारी केली होती. आज सकाळपासून सुरू असलेल्या कारवाईमध्ये 8 राज्यांमधून सुमारे 200 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 22 सप्टेंबरला 15 राज्यात पीएफआय विरोधात तपास यंत्रणांनी छापेमारी केली होती. त्यावेळी एकूण 93 ठिकाणी छाडी टाकण्यात आल्या होत्या.

पीएफआयचे (PFI) अध्यक्ष ओएम सलमान, पी कोया, ई अबूबकर, इलामरम आणि सीपी मोहम्मद बसीरसह 106 सदस्यांना अटक करण्यात आली आहे. ही संघटना युवकांना दहशवादी ट्रेनिंग देण्यासाठी पैसे पुरवत असल्याची माहिती उघड झाली आहे.

तसेच मुन्नार विला विस्टा प्रकल्पामध्ये पीएफआयने करोडो रुपये लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीएफआयवर दहशतवादी हल्ले करणे, युवकांना दहशवादी कारवायांचे प्रशिक्षण देणे, दंगल भडकवणे, हत्या करणे तसेच इस्लामीक स्टेट म्हणजेच (आयएआयएस) संघटनेमध्ये सामील करून घेणे इदयादी आरोप ठेवण्यात आले आहेत. पीएफआयवर यूएई आणि खाडी देशांमधून हवालामार्फत भारतात फंड पुरवत असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

Amrita Fadnavis : अमृता फडणवीस यांनी दिले ‘झाडू’ला प्रोत्साहन

Devi : परदेशातही आहेत देवीची शक्तीपीठे

Ashok Gehlot : अशोक गेहलोत यांचे ‘मुख्यमंत्री’ पद वाचले

मिळालेल्या माहितीनुसार उत्तरप्रदेश, दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, बिहार, गुजरात आणि आसाममध्ये मोठया प्रमाणात धाडसत्र सुरू आहे. कर्नाटकमध्ये सर्वांत जास्त पीएफआयच्या सदस्यांना अटक करण्यात आले आहे. पीएफआयप्रमाणे एसडीपीआय ही संघटना देखील दहशतवादी संघटनांना फंड पुरवत असल्याचे तपासात अढळून आले आहे. गुजरातमधून देखील पीएफआयच्या 10 सदस्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तर महाराष्ट्र आणि आसमामधून 50 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्लीमधील शाहीन बागेमध्ये देखील मोठी कारवाई करण्यात आली आहे. तिथून 4 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, कलम 144 लागू करण्यात आले आहे. तर बिहारमधून 15 लोकांना ताब्यात घेण्यात आले. इंदौर आणि उज्जैनमधून 7 जणांना ताब्यात घेण्यात आले.

रूपाली केळस्कर

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

9 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

10 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

11 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

11 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

11 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

13 hours ago