मंत्री जयंत पाटील, धनंजय मुंडे सरकारी बंगल्याबाहेर; पीडब्ल्यूडीच्या कारभाराचा नमुना

टीम लय भारी

मुंबई :- प्रचंड भ्रष्टाचारी आणि घोटाळेबाज अशी सार्वजनिक बांधकाम खात्यातील (PWD) अधिकाऱ्यांची प्रतिमा आहे. या अधिकाऱ्यांच्या नमुनेदार कारभाराचे चटके सरकारमधील मातब्बर मंत्र्यांनाही बसत आहेत (PWD department did injustice with Jayant Patil and Dhananjay Munde).

ठाकरे सरकार सत्तेत येवून दीड वर्ष उलटले. सर्व मंत्र्यांना तेव्हाच सरकारी निवासस्थानांचे वाटप झाले. त्यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही बंगले देण्यात आले. पण या बंगल्याचे दुरूस्ती काम अजून सुरूच आहे (PWD delayed work of Jayant Patil and Dhananjay Munde bungalow).

IAS प्राजक्ता लवंगारे यांची बदली, उद्धव ठाकरे यांनी दिले मानाचे पद

शरद पवार, प्रशांत किशोरांच्या दिल्लीतील भेटीनंतर ‘या’ चर्चांना उधाण

या दोन्हीही मंत्र्यांना मलबार येथील बंगले देण्यात आले आहेत. जयंत पाटील यांना सेवासदन, तर धनंजय मुंडे यांना चित्रकूट हे बंगले देण्यात आले आहेत. पण गेल्या व दीडेक वर्षांपासून बंगल्याचे दुरूस्ती काम सुरूच आहे.

पीडब्ल्यूडीच्या इलाखा विभागात मंत्री, न्यायाधीश व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. या व्हीआयपी भागामध्ये पीडब्ल्यूडीला प्रचंड कामे करावी लागतात. त्याचाच गैरफायदा पीडब्ल्यूडीचे अधिकारी घेत असतात (PWD officers misused of their power).

जयंत पाटील आणि धनंजय मुंडे

मंत्र्यांनी सांगितलेल्या दुरूस्तींपेक्षाही जास्त दुरूस्ती कामे अधिकारी करून ठेवतात. त्यासाठी खर्च वाढवून ठेवतात. व्हीआयपींच्या घरांची कामे करायची आहेत, म्हणून सरकारकडून घसघशीत निधी पदरात पाडून घेतात (PWD officers increased budget for restoration work).

धनंजय मुंडेंचे बंगले नाना पटोले, वर्षा गायकवाडांनी घेते; मुंडेंची मात्र पंचाईत

Coronavirus live updates: SC approves CBSE, ICSE’s evaluation criteria for Class 12 students

प्रत्यक्षात मात्र अधिकारी व कंत्राटदार हे युती करून सरकारचा पैसा हडपतात (PWD officers and Contractors doing corruption). कामांवर चिमूटभर खर्च झाला असला तरी, प्रत्यक्षात मात्र खर्चाचे आकडे फुगवून सांगितले जातात.

जयंत पाटील व धनंजय मुंडे यांच्या बंगल्याची कामे रखडण्यामागेही अधिकारी व कंत्राटदार लॉबीचा हा हेतू कारणीभूत असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या बंगल्याचेही काम बराच काळ रखडले होते. नुकतेच हे काम पूर्ण करण्यात आले आहे.

मंत्र्यांच्या बंगल्यांवर करोडो रूपयांची उधळपट्टी केल्याचा प्रकार गेल्या वर्षी समोर आला होता. ‘कोरोना’च्या संकटकाळात इतकी उधळपट्टी केल्याबद्दल सरकारवर जोरदार टीकाही झाली होती.

वास्तवात, ही उधळपट्टी पीडब्ल्यूडीतील अधिकाऱ्यांच्या खाबूगिरी वृत्तीमुळे झाली होती. त्यानंतरही अधिकाऱ्यांची खाबूगिरी थांबली नसल्याचे दिसून येत आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 day ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

4 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

4 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

4 days ago