33 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमंत्रालयधनंजय मुंडेंचे बंगले नाना पटोले, वर्षा गायकवाडांनी घेतले; मुंडेंची मात्र पंचाईत

धनंजय मुंडेंचे बंगले नाना पटोले, वर्षा गायकवाडांनी घेतले; मुंडेंची मात्र पंचाईत

टीम लय भारी

मुंबई : ‘कोविड’ कालावधीत बहुतांश मंत्री आपल्या सरकारी बंगल्यातूनच काम करीत आहेत. पण याच कालावधीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मात्र बंगल्यापासून वंचित राहावे लागले आहे ( Dhananjay Munde need Bungalow ).

मुंडे यांच्या बंगल्याची परवड सुरू आहे. त्याबाबतची कहाणी मजेशीर आहे. धनंजय मुंडे यापूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. त्यासाठी त्यांना मंत्रालयासमोरील ‘बी ४’ हा बंगला देण्यात आला होता. नवे सरकार सत्तेवर आल्यानंतरही मुंडे काही काळ याच बंगल्यावर राहात होते. मुंडे यांना हाच बंगला कायम करण्यात येईल असे अनेकांना वाटत होते. पण तसे झाले नाही.

Mahavikas Aghadi

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची या बंगल्यावर नजर पडली. त्यांनी धनंजय मुंडे यांना व्यक्तीश: विनंती केली. गायकवाड यांचे वडाळ्याला खासगी निवासस्थान आहे. पण हे घर छोटे आहे. लोक मोठ्या संख्येने भेटायला येतात. जागा छोटी असल्याने अडचण होते. त्यामुळे तुमचा बंगला मला द्या, अशी विनंती गायकवाड यांनी मुंडे यांना केली. धनंजय मुंडे यांनी दानशूरपणा दाखविला, आणि तो बंगला सरकारने वर्षा गायकवाड यांना दिला.

धनंजय मुंडे यांना मंत्रलयासमोरीलच ‘ए ९ ‘ हा दुसरा बंगला देण्यात आला. पूर्वी या ठिकाणी चंद्रकांत पाटील राहायचे. मुंडे यांना हा नवीन बंगला मिळाला खरा, पण पुन्हा माशी शिंकली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंची या बंगल्यावर नजर पडली.

हे सुद्धा वाचा

धनंजय मुंडे महिनाभरानंतर मंत्रालयात झाले रूजू

महाराष्ट्र निवडणूक आयोगाद्वारे भाजपाच्या सोशल मिडिया कंपनीचा वापर?: पृथ्वीराज चव्हाण

शरद पवारांना केंद्रात संरक्षण खात्याची जबाबदारी

विधानभवनालगतच हा बंगला आहे. त्यामुळे तो मला मिळावा, अशी विनंती पटोले यांनी केली. त्या बदल्यात पटोले यांच्याकडील मलबार हिल येथे असलेला चित्रकूट बंगला मुंडे यांना देण्यात आला. पण ‘ए – ९’ बंगल्याचे नुतनीकरण सुरू आहे. त्यामुळे नाना पटोले अद्याप या बंगल्यावर स्थलांतरीत झालेले नाहीत. पटोले आपल्या जुन्याच चित्रकूट बंगल्यावर राहात आहेत.

Laybhari appeal

मुंडेंच्या हातून मात्र दोन बंगले गेले, अन् तिसरा बंगला ताब्यात मिळालेला नाही. ‘कोविड’ची परिस्थिती उद्भवली म्हणून चित्रकूट बंगल्यावरच मुंडे यांना राहण्यापुरत्या दोन खोल्यांची तात्पुरती तजवीज केली आहे.

बंगल्याची परवड झाल्यामुळे ऐन ‘कोरोना’ काळात मुंडे यांची अडचण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. बहुतांश मंत्री आपले सरकारी काम बंगल्यावरूनच करीत आहेत. परंतु मुंडे यांच्याकडे बंगलाच नसल्याने त्यांना बीडवरून किंवा मंत्रालयातूनच काम करावे लागले. त्यांना ‘कोरोना’चा संसर्ग झाला होता. स्वतंत्र बंगला असता तर, कदाचित मुंडे यांना ‘कोरोना’ची लागण झालीच नसती अशीही शक्यता या सूत्रांनी व्यक्त केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी