महाराष्ट्र

मराठा आंदोलकांबाबत राज ठाकरे यांचे मोठे विधान…. काय म्हणाले राज ठाकरे?

जालनामध्ये शुक्रवारी मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबार पडसाद दोन दिवस राज्यात उमटत आहेत. या घटनेनंतर शरद पवार, उध्दव ठाकरे, उदयन राजे भोसले यांच्यासह विविध नेत्यांनी अंबड येथील जखमी मराठा आंदोलकांची भेट घेत आंदोलन स्थळी भेट दिली. असे असताना राज ठाकरे सोमवारी जालना जिल्ह्यात पोहचले. सकाळी ते अंबड येथे निघाले असता रस्त्यात तीनदा त्यांचा ताफा अडवण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी
मराठा आंदोलकांबाबत एक मोठे विधान केले.

मराठा आंदोलकांवर जालन्यात झालेल्या लाठीमाराचे पडसाद आजही राज्यभर उमटत आहेत. आज तर राज्यातील अनेक जिल्ह्यात बंदही पुकारण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी व्यवहार बंद आहेत. तर अनेक ठिकाणी एसटीची वाहतूक ठप्प आहे. तर, दुसरीकडे राजकीय नेत्यांचा जालन्यात जाण्याचा ओघ काही कमी होताना दिसत नाही.

राज ठाकरे हे सकाळीच जालन्याकडे जायला निघाले. औरंगाबादला आल्यानंतर ते कारने जालन्याकडे जायला निघाले होते. यावेळी राजापूर जवळ मराठा आंदोलकांची निदर्शने सुरू होती. राज ठाकरे यांचा ताफा आल्याचं समजताच या आंदोलकांना राज ठाकरे यांचा ताफा अडवला. राज ठाकरे यांनीही कारच्या खाली उतरून मराठा आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. यावेळी आंदोलकांनी राज ठाकरे यांना निवेदनही दिलं. यावेळी आंदोलकांची प्रचंड गर्दी झाली होती. राज ठाकरे यांनी आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर पुन्हा त्यांचा ताफा राजापूरकडे रवाना झाला.

त्यानंतर पुन्हा दाभरूळ गावात मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांना निवेदने दिली. पैठणच्या आडगाव जावळेतही त्यांचा ताफा अडवण्यात आला. त्यावेळी त्यांनी माईकवरून आंदोलकांशी संवाद साधला. ‘मी घटनास्थळी गेल्यावर माझी भूमिका मांडणार’ असल्याचं त्यांनी सांगितलं.’ या राजकारण्यांच्या नादी लागू नका. या लोकांना फक्त तुमची मते हवी आहेत,’ असंही ते म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरे अंबडमध्ये रुग्णालयात जाऊन जखमी मराठा आंदोलकांची विचारपूस करणार आहेत. त्यानंतर ते अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच त्यांच्याकडून घडलेल्या घटनेची माहितीही घेणार आहेत. दरम्यान, राज ठाकरे या ठिकाणी येत असल्याने या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

राज्यात आज ठिकठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. अनेक ठिकाणी निदर्शनेही करण्यात येत आहे. राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यात सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेक भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जालन्यातील लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ पुण्यात आज महाविकास आघाडीचे आंदोलन करण्यात येणार आहे. कोथरूडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हे ही वाचा 

अजित पवारांची अवस्था ‘आई जेवू घालेना, बाप भीक मागू देईना’ !

मोदींना तिहार जेल मध्ये कैद केल्याशिवाय राहणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा निर्धार

मराठा समाजाच्या आदोंलकांवरील पोलिसांच्या लाठीचार्जची उच्चस्तरीय चौकशी : एकनाथ शिंदे

सांगली जिल्ह्यातील अनेक गावात आज बंदची हाक देण्यात आली आहे. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी, जत तालुक्यातील डफळापूर गावात बंदची हाक देण्यात आली आहे. तर जतमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. सांगलीत उद्या मराठा समाजाची नियोजन बैठक पार पडणार आहे. बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

विवेक कांबळे

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

5 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

6 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

9 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

9 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

9 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

10 hours ago