30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा समाजाच्या आदोंलकांवरील पोलिसांच्या लाठीचार्जची उच्चस्तरीय चौकशी : एकनाथ शिंदे

मराठा समाजाच्या आदोंलकांवरील पोलिसांच्या लाठीचार्जची उच्चस्तरीय चौकशी : एकनाथ शिंदे

जालना जिल्ह्यात अंतरवली येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले. जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जची घटना दुर्देवी असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचे शनिवारी (दि.2) रोजी म्हटले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्य सरकारची प्रामाणिक भूमिका असून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

शिंदे म्हणाले, मराठा समाजाच्या आदोलकांवरील लाठीजार्जच्या घटनेची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली आहे. तसेच मी स्वत: या आंदोलनाच्या नेत्यांशी देखील संवाद साधला होता. त्यांच्या मुद्द्यांवर अधिकाऱ्यांकडून युद्धपातळीवर कार्यवाही सुरू असल्याचे सांगतानाच त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती देखील केली होती.

हे सुद्धा वाचा 
एक फुल, दोन हाफ…. कुणाला म्हणाले उद्धव ठाकरे!
Happy Birthday इशांत शर्मा | क्रिकेटशिवाय इशांतला आवडतात ह्या गोष्टी..
संरपंचाने पेटवली स्वत:ची कार; मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचा नोंदवला निषेध

मात्र आंदोलनावर ते ठाम राहिल्याने त्यांची प्रकृती खालावत होती. आज जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक त्यांना भेटायला गेले होते. त्यांची प्रकृती पाहून त्यांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी विनंती देखील त्यांनी केली होती, असे शिंदे यांनी म्हटले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका राज्य शासनाची आहे. या समाजाला न्याय देण्याची भावना आणि भूमिका असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी