महाराष्ट्र

Raju Patil : अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ बातमीवरून संभाजीनगर नावावरून मनसेचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना सवाल

टीम  लय भारी 

औरंगाबाद : औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यात यावे, ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर असे करावे. अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी केलीय. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची हि आग्रही मागणी आहे. गेली पाच वर्षे शिवसेना महायुतीमध्ये असताना आणि सध्या शिवसेना पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही. मात्र, या नामांतरासाठी हालचाली सुरु असल्याचे वृत्त माध्यमांत पसरले. त्यानंतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमचा त्यास विरोध असल्याचे ठामपणे सांगितले. यावरुन राज्यात चांगलच राजकारण होत आहे. आता, मनसेनं शिवसेनेला संभाजीनगर नावावरुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनवर निशाणा साधत औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यात यावे, ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. आता उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री आहेत, त्यांनी शिवसेना प्रमुखांची इच्छा पूर्ण करावी. संभाजीनगर हे नामकरण करण्याचा निर्णय कोणाच्याही दबावाला बळी न पडता घ्यावा, असे राजू पाटील यांनी म्हटलंय आहे . मनसेचे बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विट करत सत्तार बोलतात ते खरंय का ? असा सवाल केला आहे. नांदगावकर यांनी अब्दुल सत्तार यांच्यासंदर्भातील बातमीचा दाखला दिला आहे. उद्धव ठाकरेंनी मला औरंगाबाद म्हणण्याची मुभा दिली, असे सत्तार यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील एक बातमीचा फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवरुन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शेअर केला आहे. औरंगाबादचे ‘संभाजीनगर हेच नामकरण झाले पाहिजे हे श्रेय केंद्र अथवा राज्य सरकार कोणीही घ्यावे. तुमचे मंत्री अब्दुल सत्तार खरे बोलले कि खोटे? सोबत जोडलेला फोटो बरेच काही सांगून जात आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा शब्द व स्वप्न पूर्ण करावे.”, असेही नांदगावकर यांनी म्हटले आहे.

नामंतरावरून आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत – संजय राऊत

संजय राऊत यांनी औरंगाबादच्या संभाजीनगर या नामांतराच्या विषयावर भाष्य करताना म्हणाले कि, महाविकास आघाडीमध्ये नामांतरावरून कोणतेही मतभेद नाहीत. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण किंवा अन्य नेते आहेत त्यांचं औरंगजेबापेक्षा छत्रपती संभाजी राजे यांच्यावरच प्रेम आणि श्रद्धा आहे. प्रत्येक व्यक्तीची, हिंदूंची छत्रपती संभाजी महाराजांवर श्रद्धा असायला हवी. जसा बाबर आमचा कोणी लागत नाही तसा औरंगजेबही लागत नाही. दिल्लीतील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी राम मंदिर उभारण्याची परवानगी दिली आहे. कारण, या भूमीचं जसं बाबरशी नातं नाही तसंच औरंगजेबाशीही नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते एकत्र बसून यासंदर्भात चर्चा करुन निर्णय घेतील असे संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

शिवसेना नेत्यांकडून संभाजीनगर असा उल्लेख

सध्या महाविकास आघाडी सरकार असल्याने या सरकारमध्ये मतभेद होण्याची चिन्हे दिसत आहेत एकीकडे शिवसेना नेत्यांकडून औरंगाबादचा उल्लेख नेहमीच संभाजीनगर असाच केला जातो. विशेष म्हणजे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही आपल्या ट्विटर अकाउंटवरुन एक बातमी शेअर करताना औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला होता. तर, उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनीही आपल्या पत्रावर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर केला होता. त्यामुळे, सरकारकडून औरंगाबादचे नामकरण करुन संभाजीनगर हे नवीन नाव ठेवण्याच्या हालचाली होत असल्याचं चर्चा होती.

नामांतरला काँग्रेसचा विरोध

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नामांतराला विरोध दर्शविला आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहे, परंतु जेव्हा नाव बदलासंदर्भात प्रस्ताव येईल, तेव्हा आमचा विरोध राहिल. पण, अद्यापतरी कुठलाही प्रस्ताव समोर नसल्याचंही थोरात यांनी म्हटलं आहे . आम्ही राज्यघटनेची शपथ घेऊन सत्तेत आलो आहे . त्यामुळे, त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. कॉमन मिनिमम प्रोग्रॅमद्वारे महाविकास आघाडीही एकत्र आलेली आहे. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामकरणाला आमचा विरोध राहिल, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

7 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

9 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

9 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

10 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

11 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

12 hours ago