महाराष्ट्र

रोहित पवारांनी केले न्यायालयाच्या मताचे स्वागत परिस्थिती समजून घेण्याचे केंद्राला केले आवाहन!

टीम लय भारी

मुंबई :-  कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसतो आहे पण देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यात लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. लसीवरून सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केंद्र सरकारला (Central Government) सोमवारी फैलावर घेतले आहे. न्यायालयाने मांडलेल्या मताचे स्वागत करत रोहित पवार यांनीही परिस्थिती समजून घेण्याचे आवाहन केंद्राला केले आहे(Welcoming the court order, Rohit Pawar also appealed to the Center to understand the situation).

लसीकरण कार्यक्रमाच्या रणनीतीवरून सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केंद्र सरकारला (Central Government) फटकारले. न्यायालयाच्या मतांचा हवाला देत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली. “भारत हे संघराज्य असल्याची आठवण खुद्द सुप्रीम कोर्टानेच सरकारला करून दिली, हे बरे झाले. प्रश्न उरतो कोर्टाचे म्हणणे सकारात्मक घेऊन आपण त्यात बदल करतो की नाही याचा! राज्या-राज्यात स्पर्धा लावून कोरोनाचे संकट टळणार नाही, तर केवळ राज्यांची दमछाक होईल, हे केंद्र सरकारने (Central Government) लक्षात घ्यावे!,” असे रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटले आहे.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मराठा तरुणांना EWS आरक्षण मिळणार

चंद्रकांत पाटलांच्या मागणीला रोहित पवारांचे चोख प्रतिउत्तर

“कोरोनाने थैमान मांडल्याने देशाची अर्थव्यवस्था गडगडली आणि बेरोजगारी वाढली. अशा परिस्थितीत सरकारने कोरोना नियंत्रणावर आधी पूर्ण लक्ष केंद्रित करून राज्यांमध्ये कोणताही दुजाभाव न करता त्यांना मदत करावी. असे केले तरच कोरोनाच्या संकटावर आपण मात करू शकू!,” असे रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटले आहे.

Aligarh liquor tragedy: Toll rises to 36, police arrest 17 accused

सर्वोच्च न्यायालय केंद्राला काय म्हणाले?

“राज्य सरकारे कोरोना लशींसाठी ग्लोबल टेंडर काढत आहेत. हेच केंद्र सरकारचे (Central Government) धोरण आहे का? लशींसाठी आपण राज्यांमध्ये स्पर्धा लावण्याचा प्रयत्न करीत आहात का? आम्हाला स्पष्ट दिसतेय, वेगवेगळी राज्य आणि महानगरपालिका ग्लोबल टेंडर काढत आहेत. राज्य आणि महानगरपालिकेने त्यांचे त्यांचे पाहून घ्यावे, अशी सरकारची रणनीती आहे का? मुंबई महापालिकेच्या बजेटची तुलना इतर राज्यातील शहरांशी करा. काही राज्यांपेक्षा मुंबई महापालिकेचे बजेट मोठे आहे. महापालिकांना ग्लोबल टेंडरसाठी आपण परवागनगी देत आहात का? लशींची किंमत आणि वाटाघाटीसाठी केंद्राकडे काही योजना आहे का?,” अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केंद्राला फटकारले होते.

Rasika Jadhav

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

4 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

6 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

6 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

7 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

8 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

9 hours ago