महाराष्ट्र

संजय राऊत म्हणाले… ग्रेट, राजभवनची खिंड पडली!

औरंगाबाद येथे राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी छ. शिवरायांवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर संतापाचा आगडोंब उसळला आहे. राज्यपालांना महाराष्ट्रातून हाकलुन द्यावी अशी मागणी देखील मोठ्याप्रमाणात होत होती. त्यातच आता राज्यपालांनी स्वत:च पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे वृत्त समोर येत आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत राजभवनची खिंड पडली, असे म्हटले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात छ. शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचे म्हटले होते. त्यानंतर राजपालांविरोधात राज्यभरात संतापाचा वणवा पेटला, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष, काँग्रेसपक्ष, अनेक संघटना, तसेच नागरिकांनी देखील त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलने केली. तसेच राज्यपालांना महाराष्ट्रातून हाकलून देण्याची मागणी देखील केली. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील राज्यपालांवर कडाडून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपालांना हटवा अन्यथा थेट महाराष्ट्र बंदचा इशारा देखील दिला होता.

काय ट्विट केले संजय राऊत यांनी ?
दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीच आता पदमुक्तीचे संकेत दिल्याचे बोलल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. खासदार संजय राऊत यांनी याबाबत ट्विट केले असून त्यांनी म्हटले आहे की, ”राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना विरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील! राजभवनाची खिंड पडली.आवाज शिवसेनेचाच! जय महाराष्ट्र!”

राज्यपाल कोश्यारी यांची वारंवार वादग्रस्त वक्तव्ये
औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दिक्षांत सोहळ्यात बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचे म्हटले होते. या आधी मराठी लोकांबाबत देखील त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसेच पुण्यात एका कार्यक्रमात देखील कोश्यारी यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबद वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसेच शिवरायांबाबद यापूर्वी देखील औरंगाबाबद येथेच त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झो़ड उठली होती.

 

 

प्रदीप माळी

Recent Posts

जाहिरातीच्या होर्डिंगसाठी दुर्मिळ झाडाची छाटणी; पर्यावरण प्रेमींचा संताप

रविवारी पाच मे रोजी सकाळी मायको सर्कल येथील चौकातील अनेक वर्षांपासून असलेले जुने पिंपळ, चिंचेच्या…

24 mins ago

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आता पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण शक्य

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये (SMBT hospital )आता पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण शक्य झाली . तर एन्डोस्कोपी,…

41 mins ago

उन्हाळ्यात ब्रोकोली खाण्याचे फायदे

ब्रोकली (broccoli) उन्हाळ्यात (summer) खाल तर अनेक समस्या दूर होतील. उन्हाळ्यात ब्रोकलीचा आहारात समावेश केल्यावर…

1 hour ago

हसण्याचा आरोग्याला मिळणारे फायदे:जागतिक हास्य दिन

जागतिक हास्य दिन ( World Laughter Day) दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.…

2 hours ago

सप्तशृंग गडावरुन उडी घेत युगलाची आत्महत्या

आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणी सप्तशृंग गडाच्या (Saptashringa Gada) शीतकड्यावरुन धक्कादायक घटना समोर आली आहे.…

2 hours ago

कांदा निर्यातबंदी हटताच कांदा भावात ५०० रूपये वाढ

कांदा बेल्ट असलेल्या भागात तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून त्यापूर्वीच कांदा निर्यातबंदी (onion…

3 hours ago