सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या स्पर्धकांनी घेतली राज ठाकरेंची भेट!

टीम लय भारी

मुंबई : झी मराठीवरील ‘सा रे ग म प’ लिटील चॅम्प या शोमुळे अनेक नवोदित गायकांचे भविष्य घडले. या शोमुळे महाराष्ट्राला नाजूक सुरांची मेजवानी अनुभवता आली. झी मराठीचा ‘सा रे ग म प’ हा अनेकांच्या स्वप्नपूर्तीचा मंच आहे असे म्हटले तर खोटे ठरणार नाही. या मंचाने आजवर अनेक उत्तमोत्तम गायक, गायिका, संगीतकार या मोनोरंजन क्षेत्राला दिले आहेत. सध्या सुरु असलेल्या सा रे ग म प लिटील चॅम्पचा महाअंतिम सोहळा लवकरच पार पडणार आहे. त्यापूर्वी लिटिल चॅम्प्सने मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे(Saregamapa Little Champs contestants met Raj Thackeray).

पंचरत्नांचे योग्य मार्गदर्शन, मृण्मयी देशपांडे खुमासदार सूत्रसंचालन आणि १४ लिटिल चॅम्प्सचे धमाकेदार परफॉर्मन्सेस यामुळे सारेगमप लिटिल चॅम्प्सच हे नवीन पर्व गाजले. अगदी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी या पर्वाला पसंती दर्शवली. या १४ स्पर्धकांचा प्रवास प्रेक्षकांनी पाहिला. या १४ अप्रतिम गाणाऱ्या स्पर्धकांमध्ये कोण वरचढ आहे हा निर्णय घेणे पंचरत्नांसाठी सुद्धा कठीण होते.

सलमान आणि आयुषच्या ‘अंतिम’ची जादू, पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी

पुण्यात पुन्हा निर्बंध, चित्रपट गृह, नाट्यगृहांमध्ये 50 टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश

ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून, पलाक्षी दीक्षित, ओंकार कानेटकर, गौरी गोसावी, प्रज्योत गुंडाळे, सारंग भालके, रीत नारंग आणि स्वरा जोशी हे सात स्पर्धक महाअंतिम सोहळ्यात एकमेकांशी स्पर्धा करणार आहेत. हे सातही स्पर्धक प्रेक्षकांचे लाडके आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोण विजेता ठरणार हे सांगणे खूपच अवघड आहे.

महाअंतिम सोहोळ्याआधी या ७ ही जणांनी मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. हे स्पर्धक राजसाहेबांना भेटून खूप भारावून गेले. राज ठाकरेंनी या मुलांना इलेक्ट्रिक तानपुरा आणि तबला भेट दिला. यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

अभिनेत्री स्वरा भास्कर होणार आई, म्हणाली मुलासाठी अजून काही थांबू शकत नाही

Sa Re Ga Ma Pa Li’l Champs: Popular singer Mahalaxmi Iyer and lawyer Ujjwal Nikam to grace the Diwali special episode

Team Lay Bhari

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

3 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

5 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

5 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

6 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

6 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

7 hours ago