महाराष्ट्र

सरपंचाने स्वतःची जमीन पडीक ठेवून गावाला दिलं पाणी

दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने गावोगावी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना दुष्काळी खानापूर तालुक्यातील रेवणगावचे सरपंच सचिन मुळीक यांनी आपली शेती पडीक ठेवून आणि स्वखर्चातून पाईपलाइन करून गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिलं आहे. सरपंच सचिन मुळीक यांच्या या दातृत्वाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

रेवणगाव हे खानापूर घाटमाथ्यावरील एक चार एक हजार लोकसंख्या असलेले गाव…सचिन मुळीक हे या गावचे विद्यमान सरपंच… गावाला फेब्रुवारीपासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जाणवू लागला..गावाला जलजीवनची योजना होती पण ती अपूर्णय. त्यामुळे फेब्रुवारीमधेच शासनाकडे टँकरची कशी मागणी करायची असा प्रश्न निर्माण झाला. गावचे सरपंच सचिन मुळीक आपल्या चार एकर शेतातील पिकाना बोअरवेलचे पाणी शेततळ्यात टाकुन देत होते. रेवणगावात पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर गावाला पाणी कुठून उपोषण करून द्यायचे असा प्रश्न उभा राहिला असताना गावचे सरपंच सचिन मुळीक यांनी आपल्या शेतातील बोअरवेलचे पाणी शेततळ्याच्या माध्यमातून गावाला देण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी लाखभर रुपये खर्च करून शेतापासून गावापर्यंत स्वखर्चाने पाईपलाइन देखील बनवली आहे.

गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतोय हे पाहून शेवटी सरपंचाने मार्च पासूनच शेतीला पाणी न देता आता गावाला पाणी देण्याचा निर्णय घेतला. यासाठी शेततळ्यापासून ते गावच्या पाण्याच्या टाकीपर्यत सरपंचाने लाखभर खर्च करून पाइपलाइन देखील केली. आज दिवसाला 70 हजार लिटर पाणी ते स्वतःची जमीन पडीक ठेऊन देत आहेत.
गावाशेजारी असणाऱ्या तलावात देखील पाणी नाही.

हे सुद्धा वाचा 

मल्लिकार्जुन खरगे यांना वंचितचे खुले पत्र!
शरद पवारांनंतर माझा नंबर लागतो : मल्लिकार्जून खर्गे
जगाने अणू बॉम्बचा कहर पहिला; विनाशकारी दुसऱ्या महायुद्धाचा अस्त झाला!

शेतातील पीक पावसाअभावी जळून जातेय. यातच पिण्याच्या पाण्यासाठी जर वणवण करावी लागली असती..पण सरपंच मोठ्या मनाने आज गावची गेल्या सहा महिन्यापासून तहान भागवतोय. त्यामुळे गावकऱ्याचा खऱ्या अर्थाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सरपंचाने स्वतःची शेती पडीक ठेऊन घेतल्याने गावकरी आमचा सरपंच हा खऱ्या अर्थाने गावची काळजी घेणारा सरपंच असल्याच्या भावना व्यक्त करतायत. जर टँकर सुरू झाला असता तर पाणी जास्त करून महिलांनाच आणावे लागते. त्यामुळे सरपंचानी पाणी दिल्यामुळे आमचा कोसो दूर जाऊन कंबर, डोक्यावररुन पाणी आणण्याचा त्रास कमी झाल्याच्या भावना महिला व्यक्त करत आहेत.

प्रताप मेटकरी, विटा

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago