सत्यजित तांबे यांचा पुढाकार, युवक कॉंग्रेसने केले वृक्षारोपण

टीम लय भारी

संगमनेर : महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांचा स्नेह मेळावा नुकताच संगमनेर येथे संपन्न झाला. सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संगमनेर पावबाकी रोडवर 301 वृक्षांचे रोपण करण्यात आले असून या वृक्षांच्या ट्री गार्ड वर या विविध पदाधिकाऱ्यांच्या नामाचे फलक देखील लावण्यात आले. आणि यामुळे राज्यभरातील युवकांचा संगमनेरची स्नेहसंबंध कायमस्वरूपी आठवण ठरणार आहे असे सत्यजित तांबे म्हणाले(Satyajit Tambe’s initiative, Youth Congress planted trees).

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी व सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष संगमनेर मधील विविध सहकारी संस्था, ग्रामीण अर्थव्यवस्था यांच्या अभ्यास दौरा करण्यासाठी आले होते. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी सहकारातील अग्रगण्य असणारा सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची कार्यपद्धती, गाळप क्षमता, वीज निर्मिती व उपपदार्थांची निर्मिती यांची माहिती घेतली. तर राजहंस दूध संगमनेर संकलन,वितरण, मार्केटिंग, गावोगावी असलेल्या दूध सोसायट्या, पतसंस्था या बाबतची माहिती घेतली(Sneha Melawa was held recently under the leadership of Satyajit Tambe).

दंडकारण्य अभियान ही संगमनेरची राज्याला असलेली देणे असून या अभियानांतर्गत उघड्या बोडक्या डोंगरांवर झालेली वनराई व मागील सोळा वर्षात तीस कोटी बियांची रोपण आणि 29 लाख वृक्षांचे रोपण यामुळे पर्यावरणाचा संदेश देणारे हे अभियान सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. हीच प्रेरणा घेत हा अभ्यास दौरा कायम स्मरणात राहावा म्हणून सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून संगमनेर ते पावबाकी रोड या रोडच्या दुतर्फा विविध 301 वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे(Various 301 planted tree on both the sides of Sangamner to Pavbaki Road).

हे सुद्धा वाचा

काँग्रेसने निधी वाटपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर साधला निशाणा

काँग्रेसच्या रॅलीतील वारकऱ्यांचा भन्नाट किस्सा

बाळासाहेब थोरातांचा भाजपवर घाव, गोव्यातील जनतेचा कॉंग्रेसवर विश्वास !

Election for Maharashtra Assembly Speaker in first week of budget session: Congress

या युवक पदाधिकाऱ्यांनी राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांच्या बरोबर ही संवाद साधून विविध विकास कामांवर चर्चा करत मार्गदर्शन घेतले. असे सत्यजित तांबे या अभियानात युवकांवा संबोधत म्हणाले.

Team Lay Bhari

Recent Posts

द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर उपाययोजना कराव्या; मंत्री छगन भुजबळ

नाशिक शहरातील द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी (avoid traffic) टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका…

24 mins ago

नाशिकमध्ये मतदान केंद्र प्रमुखाला धमकी; नाशकात पती-पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल,…

47 mins ago

पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…

2 hours ago

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

4 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

5 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

6 hours ago