Maratha Reservation : जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात, संगीता वानखेडे यांचा गंभीर आरोप

मराठा आरक्षण आंदोलनातील महत्वाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर आंदोलनातीलच अनेक सहकारी आरोप करत आहे. जरांगे पाटलांवर अजय महाराज बारसकर यांनी आरोप केलेले होते, आता त्यांच्या पाठोपाठ संगीता वानखेडे यांनीही आरोप केलेला आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनापाठीमागे शरद पवारांचा हात आहे, असा गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी केलेला आहे.

“जरांगेंच्या आंदोलनाला शरद पवार यांची साथ होती, हे पुढील काही दिवसांत समोर येईल. आमच्या बैठका होत असताना जरांगे पाटील यांना कुणाचातरी फोन आयचा, हा फोन शरद पवारांचा होता.”, असा दावा करत संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्राला बनवलं वेड

वानखेडे म्हणतात की, “मनोज जरांगे यांनी महाराष्ट्राला वेड बनवलं. तिथे दंगल घडली का घडवली, सरकारने शोध लावावा. मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार यांचा हात आहे.” संगीता वानखेडे या मनोज जरांगे यांच्यासोबत मराठा आंदोलनात  कार्यरत होत्या. मात्र त्यांनी आता फारकत घेतली आहे, त्यानंतर जरांगेंवर टीका केली आहे.

मनोज जरांगे कोण हे मीडियालासुद्धा माहिती नव्हते. मनोज जरांगे भोळा भाबडा माणूस, मूळ भाषा शैलीत बोलणारा माणूस म्हणून मी आधी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मनोज जरांगे यांची बाजू घेऊन छगन भुजबळ यांना मी ट्रोल केलं होतं तेव्हा ते लोकं मला गलिच्छ भाषेत बोलत होते. एक ते दीड महिन्यांपासून मी मनोज जरांगे  यांचा विरोध करतेय, विषाची बाटली घेऊन मी सोशल मीडियावर बसतेय.

तो फोन फक्त शरद पवारांचाच येत होता

मनोज जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते, फक्त एक फोन ज्याचा येत होता त्यांना विश्वासात घेत होते. तो फोन शरद पवार यांचाच होता. शरद पवार मनोज जरांगे यांना फोन करत होते. मराठ्यांना आरक्षण मिळत होतं म्हणून अनेक गोष्टींकडे कानाडोळा केला. पुण्यात मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते. टोपी घालून मनोज जरांगेंसोबत मी आख्खं पुणे फिरले. शरद पवार जसं सांगतात तसंच मनोज जरांगे करतात. आरक्षणाचे मारेकरी शरद पवार आहेत, असंही संगीता वानखेडे म्हणाल्या.

हेही वाचा : अरे बाप रे! भाजीत आढळला चक्क जिवंत साप, व्हिडीओ पाहून नेटकरी झाले हैराण

टीम लय भारी

Recent Posts

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

1 hour ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

1 hour ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

2 hours ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

2 hours ago

कुटुंबीयांसमवेत मंत्री छगन भुजबळ यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी आज…

2 hours ago

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

15 hours ago