35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeव्हिडीओअरे बाप रे! भाजीत आढळला चक्क जिवंत साप, व्हिडीओ पाहून नेटकरी झाले...

अरे बाप रे! भाजीत आढळला चक्क जिवंत साप, व्हिडीओ पाहून नेटकरी झाले हैराण

मंदिरात आयोजित केलेल्या भंडारा कार्यक्रमात भाविकांसाठी जेवण तयार करण्यात आले होते. मात्र, भाजीमध्ये जिवंत साप आढळून आल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून युसर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. तर जेवण जेवलेल्या भाविकांना तातडीने रुग्णालयात भरती करा, असा सल्लाही नेटकरी देताना दिसत आहेत.

भंडाऱ्यात विविध मंदिरांमध्ये भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. त्यानिमित्ताने भाविकांसाठी महाप्रसादाची सोयदेखील करण्यात येते. मात्र, अशा एकात महाप्रसादाच्या भाजीमध्ये जिवंत साप आढळून आल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये हा साप जेव्हा भाजीमधून बाहेर काढला जात आहे, त्यात त्या सापाची हालचाल स्पष्ट दिसत आहे. हा साप कोणत्या जातीचा आहे, तो विषारी आहे की नाही, या संदर्भात कोणतीच माहिती समोर आलेली नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना युजर्सने असं म्हटलंय की,“भंडाऱ्यातील जेवणात आढळलेला हा कॉमन सॅण्ड बोआ आहे आणि तो विषारी नाही. दुसऱ्याने लिहिले की, हा साप रसेल वायपर प्रजातीचा आहे आणि सर्वांत विषारी मानला जातो. आणखी एका युजरने, ज्यांनी ज्यांनी ही भाजी खाल्ली आहे, त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करावे”, असा सल्लाही नेटकऱ्यांनी दिलेला आहे.

व्हिडीओ बारकाईने पाहिला असता भाजी असलेल्या बादलीत हा साप वळवळताना दिसत आहे. नंतर एक व्यक्ती भाजीच्या बादलीतून पळीच्या साह्याने हा साप बाहेर काढून दाखवत आहे. ज्यावेळी हा साप बाहेर काढला जातो, त्यावेळी हा या सापाची हालचाल स्पष्टपणे दिसून येत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडूनही विविध प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळे कधी, कुठे असा प्रकार घडला की, लोक तातडीने आपल्या मोबाईल असे हैराण करणारे व्हिडीओ शूट करतात, त्यानंतर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर अपलोड केले जातात. त्यानंतर अशा प्रकारच्या व्हिडीओवरदेखील नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येते. भंडाऱ्यातील वटाणा-बटाटा भाजीत चक्क साप आढळून आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला. हा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण झाले आणि त्यांच्याकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. यापूर्वीही मागील वर्षी बिहारच्या एका सरकारी शाळेत असाच एक प्रकार समोर आला होता, त्यात अनेक विद्यार्थी आजारी पडलेले होते.

हेही वाचा : क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! आज सायंकाळी जाहीर होणार IPL 2024 वेळापत्रक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी