महाराष्ट्र

शरद पवार मराठा आंदोलकांना भेटणार!

जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात काल पोलिसांनी मराठा आंदोलकांवर अमानुष अत्याचार केला. त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद मराहाष्ट्रात उमटत असून अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. शिंदे-फडवणवीस-पवार सरकार आंदोलकांशी संवाद ठेवण्यास सपशेल अपयशी ठरल्याची टीका विरोधकांनी केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील सरकारवर टिका केली असून ते आता मराठा आंदोलकांची भेट घेणार आहेत.

शरद पवार बीड, जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार असून ते आंदोलकांना भेटून संवाद साधणार आहेत. आज पवार जालन्यात जाणार असून तेथे रुग्णालयात जखमींची विचारपूस देखील करणार आहेत. आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून अनेक ठिकानी वाहनांची जाळपोळ केल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. मराठा समाजाने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन केल्याच्या देखील घटना समोर आल्या. मराठा समाज अत्यंत संतप्त झाला असून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज्यभरात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
हे सुद्धा वाचा 
पोलिसांचा मुर्खपणा, शिंदे – फडणवीस यांना डोकेदुखी!   
उद्धव ठाकरे जालना दौऱ्यावर, जखमी मराठा आंदोकांची भेट घेणार!
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

मराठा समाजाच्या आंदोलकांवर काल पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर शरद पवार यांनी ट्विट करुन निषेध व्यक्त केला होता. पवार म्हणाले, महाराष्ट्रात सध्या फक्त आणि फक्त हुकूमशाही चालू आहे. राज्य सरकार आणि गृह खात्यावर राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे काम असते, परंतु गृहमंत्रालयातील प्रशासकांनी पोलिस बळाचा वापर करून मराठा आंदोलकांवर तीव्र लाठीचार्ज केलेला आहे. हि अतिशय संतापजनक बाब आहे . जालन्यात झालेल्या ह्या अमानवीय घटनेला राज्याचे गृहमंत्रालय जबाबदार असून मी या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो.

प्रदीप माळी

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

3 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

4 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

4 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

5 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

6 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

6 days ago