35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरे जालना दौऱ्यावर, जखमी मराठा आंदोकांची भेट घेणार!

उद्धव ठाकरे जालना दौऱ्यावर, जखमी मराठा आंदोकांची भेट घेणार!

जालन्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी (शनिवार, २ सप्टेंबर) अंबड आणि आंतरवाली सराटी गावांना भेट देणार आहेत. उद्धव ठाकरे पोलिसांच्या लाठीमारात जखमी झालेल्या कार्यकर्त्यांनाही अंबड शासकिय हॅास्पिटलमध्ये जाऊन भेटणार आहेत. मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते मराठा कार्यकर्त्यांना भेटून त्यांचे मनोधैर्य वाढवणार असल्याचे समजते. जालन्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर शुक्रवार, १ सप्टेंबर रोजी पोलिसांनी भीषण लाठीचार्ज केला. पोलिसांच्या या लाठीचार्जनंतर एकाच खळबळ उडाली आहेव. याबाबतचा विडिओ समाजमध्यमांवर मोठ्या प्रमाणात वायरल होत असून महाराष्ट्रात ठिकठिकाणी यांचे पडसाद उमटत आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाळी सराटी या गावात सादर घटना घडली आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून उपोषण केले होते. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा यासाठी हे उपोषण करण्यात आले होते. परंतु, पोलिसांनी आंदोलकांनी टाकलेल्या मंडपात घुसून आंदोलयांकर्त्यांवर बेछूट लाठीचार्ज केला. यावेळी, आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचे आरोप पोलिसांनी केले आहेत. तसेच आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी हवेत गोळीबार करून शांतिपूर्वक आंदोलन चिरडले.

अंतरवली घटनेबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर प्रकारबाबत चौकशीचे आदेश दिले असून यांची माहिती त्यांनी ट्विटर वरुन दिली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत, जनतेने शांतता राखावी.”

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया

या घटनेबाबत प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी रास्त, न्याय्य मागणी आहे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे किंवा राज्यात कुठेही होणाऱ्या शांततामय आंदोलनाला आमचा, राज्यातील नागरिकांचा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणाचा लढा रस्त्यावर आणि न्यायालयातही तितक्याच ताकदीनं लढण्याची आपली सगळ्यांची भूमिका आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट आणि सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. यावरच आंदोलनाचे यश अवलंबून आहे. जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास मी राज्यातील नागरिकांना देतो.”

“राज्यातील मराठा आंदोलनानं लोकशाही व्यवस्थेत शांततामय आंदोलनाचा आदर्श निर्माण केला आहे. हा आदर्श आणि गौरवशाली परंपरा कायम ठेऊन, कायदा सुव्यवस्था कायम राखत लोकशाही मार्गानंच हे आंदोलन पुढे जाईल, याची काळजी महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपल्याला घ्यावी लागेल. राज्य शासन आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जण मराठा आंदोलकांच्या सोबत आहे. असा विश्वास देतो. अंबड येथील घटनेतील दोषी पोलिसांवर निश्चित कारवाई करण्यात येईल, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. राज्यात परिस्थिती बिघडणार नाही, शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी सर्वांनी घ्यावी, असं आवाहन मराठा आंदोलक आणि राज्यातील नागरिकांना आहे.” असे ते पुढे म्हणाले.

या घटनेनंतर, महाराष्ट्रात खळबळ उडाली असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सकाळ मराठा समाजाद्वारे शनिवार, २ सप्टेंबर रोजी बंद पुकारण्यात आला आहे. या घटनेविषयी राजकीय नेत्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या असून अनेक राजकीय नेते हे अंतरवाली सराटि गावाला भेट देणार आहेत.

शरद पवार यांचे गृहमंत्र्यांवर टीकास्त्र

राष्ट्रवादी कॉँग्रेस चे सर्वेसर्वा शरद पवार या घटनेचा निषेध व्यक्त करत ट्विट करून म्हणाले, “महाराष्ट्रात सध्या फक्त आणि फक्त हुकूमशाही चालू आहे. राज्य सरकार आणि गृह खात्यावर राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे काम असते, परंतु गृहमंत्रालयातील प्रशासकांनी पोलिस बळाचा वापर करून मराठा आंदोलकांवर तीव्र लाठीचार्ज केलेला आहे. हि अतिशय संतापजनक बाब आहे . जालन्यात झालेल्या ह्या अमानवीय घटनेला राज्याचे गृहमंत्रालय जबाबदार असून मी या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो.” शरद पवारसुद्धा आंदोलयांकर्त्यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटी गावाला भेट देणार आहेत.

हे ही वाचा 

आठवले, जानकर, कवाडे म्हणाले मोदींच्या विजयासाठी एकदिलाने काम करु !

मल्लिकार्जुन खरगे यांना वंचितचे खुले पत्र!

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी केले ‘रास्ता रोको’

संभाजीराजे छत्रपतीही आंदोलनकर्त्यांना भेटणार

या घटनेबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटर वर आपल्या भावना व्यक्त करत म्हणाले, “अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला व शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल. मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणूकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार असेल.” संभाजीराजे लवकरच अंतरवाली सराटी गावाला भेट देऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेणार आहेत.

शरद पवारांसमोर निलेश राणेंची औकात काय?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी