महाराष्ट्र

संजय राऊतांचा प्रश्न, फडणवीस तुम्ही कोणाचे चमचे?

 

भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर होणाऱ्या टीकेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत, भाजपला खडे बोल सुनावले आहे. संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.राज्यातील विरोधी पक्षातील नेतेमंडळी शरद पवार यांची सात्यताने बदनाम करत आहे. शरद पवारांचा दाऊदचा कसला संबंध का लावला जातोय? अशी विचारणाही संजय राऊतांनी केली आहे.

शरद पवारांनी महाराष्ट्र घडवण्यासाठी मोठं योगदान दिलं आहे. त्यांनी संसदीय लोशाहीत तब्बल ५०-५५ वर्ष घालवलीत त्यांच्याविषयी कोणती भाषा भाजपाचे लोक वापरत आहेत,”राजकारणात मतभेद असू शकतात, गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांसारख्या उत्तुंग नेतृत्वाविषयी चूकीची भाषा वापरली जाते.

आम्ही काही बोललो की शरद पवारांचे चमचे म्हटलं जातं. असा संताप संजय राऊतांनी व्यक्त केला. या वेळी खासदार संजय राऊतांनी यांनी तपास यंत्रणांवरच प्रश्न उपस्थित केले आहे. राज्यात महाविकास आघाडी सत्ते आल्यापासून शरद पवार यांची बदनाम केलं जात आहे. काल पक्षात आलेले लोक हे शरद पवारांसंबंधी ज्या भाषेत बोलत आहेत हे फडणवीस, मोदींना, गडकरींना मान्य आहे का? अशी विधाने मान्य नसेल तर महाराष्ट्राचे पुढारी म्हणून त्यांनी खंडन, निषेध केलाच पाहिजे.

Shweta Chande

Recent Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

50 seconds ago

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

15 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

16 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

16 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

17 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

17 hours ago