महाराष्ट्र

School Edcation : राज्यात शैक्षणिक वर्ष सुरु, पहिली, दुसरीसाठी ऑनलाईन नाही!

टीम लय भारी 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मान्यता दिली आहे. ऑनलाईन, डिजीटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर शाळा सुरु करण्यात येणार आहे. तसंच ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही त्या ठिकाणी पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा उघडता येतील, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. (CM Uddhav Thackeray meeting on School Reopen again) मात्र ऑनलाईनबाबत पालकांच्या मतांचा विचार करण्यात आलेला आहे. पहिली व दुसरीची मुले लहान असतात, त्यांच्यासाठी ऑनलाईन पर्याय दिला जाणार नाही. असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिक्षण विभागासोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक आयोजित केली होती. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या देखील या बैठकीत उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीत या बैठकीत शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. लवकरच त्यासाठीची घोषणा केली जाणार आहे. ऑनलाईन, डिजीटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर शाळा सुरु करता येऊ शकतात. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरु करण्यास मंजूरी दिली आहे.

मात्र ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुभाव आहे त्या ठिकाणी मात्र परिस्थिती पाहून निर्णयात बदल केला जाईल. मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत बैठकीत निर्णय घेतला जाईल.

शाळा सुरू करण्याचे काय आहे नियोजन….

रेड झोन मध्ये नसलेल्या 9, 10, 12 वी शाळा-कॉलेज जुलैपासून, 6 वी ते 8 वी ऑगस्टपासून, वर्ग 3 ते 5 वी सप्टेंबरपासून, वर्ग 1 ते 2 री शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने, इयत्ता 11 वीचे वर्ग पुढील महिन्यात लागणाऱ्या दहावीच्या निकालानंतर सुरु करण्याचे नियोजन आहे.

ज्या ठिकाणी शाळा सुरु होणार नाही तिथे टाटा स्काय, जिओ यांच्या मदतीने शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट लगेचच सुरु करून त्याचा बारकाईने आढावा घेण्याचे मुख्यमंत्री म्हणाले. काही कंपन्यांनी इतर राज्यांत प्रयोग केले आहेत त्याचीही परिणामकारकता तपासावी असे मुख्यमंत्री म्हणाले.

पहिली, दुसरीसाठी ऑनलाईन नाही…

ऑनलाईनबाबत पालकांच्या मतांचा विचार करण्यात आलेला आहे. पहिली व दुसरीची मुले लहान असतात, त्यांच्यासाठी ऑनलाईन पर्याय दिला जाणार नाही. ३ ते ५ वीच्या मुलांना दररोज १ तास व पुढील वर्गाच्या मुलांना दोन तासांपर्यंत ऑनलाईन, डिजिटल शिक्षण देण्याचे नियोजन आहे अशी माहिती वर्ष गायकवाड यांनी दिली.

दरम्यान महाराष्ट्र अनलॉक होण्याच्या दिशेने टप्प्याटप्प्याने वाटचाल करत आहे. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने तूर्तास तरी शाळा ऑनलाईनच उघडण्यात आल्या आहेत. काही बोर्डाच्या शाळा आधीच उघडल्या असल्या तरी महाराष्ट्रात एसएससीच्या शाळा आज ऑनलाईन सुरु झाल्या आहेत. ई-स्कूलमुळे विद्यार्थांना शारीरिक ताण येण्याची शक्यता व्यक्त करत काही पालक आणि संघटनांनी विरोध दर्शवला होता, मात्र कुठल्याही परीस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, ही भूमिका घेत राज्य सरकारने शाळांचे टाळे ऑनलाईन उघडले. (CM Uddhav Thackeray meeting on School Reopen again)

राजीक खान

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

5 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

5 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

6 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

7 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

8 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

9 hours ago