टॉप न्यूज

 अभिनेता सुशांतच्या ‘त्या’ फोटोवरून पोलिसांनी दिला ‘हा’ इशारा!

टीम लय भारी

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने काल आत्महत्या केली. आत्महत्येनंतर त्याच्या मृतदेहाचे फोटो सोशल नेटवर्किंगवर मोठ्या प्रमाणात शेअर झाले. हे फोटो धक्कादायक आणि शेअर करण्यासारखे नाहीत. अशाप्रकारचे फोटो शेअर करणे कायद्याच्या नियमांप्रमाणे गुन्हा आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार अशाप्रकारच्या कृतीसाठी कायदेशीर करावाई केली जावू शकते. महाराष्ट्र सायबर सेल सर्वांना अशाप्रकारचे फोटो सर्क्युलेट करु नये असं आवाहन करत आहे. जर असे फोटो शेअर केले असतील तर ते डिलीट करावेत,” असं पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सुशांतने रविवारी (१४ जून) मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तो ३४ वर्षांचा होता. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत त्याने करिअरला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुशांतने आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप समजू शकलेलं नसून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. आत्महत्येनंतर सुशांतच्या घरातील काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये सुशांतचा मृतदेह दिसत आहे. मात्र आता याच फोटोंवरुन महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने इशारा दिला आहे. सायबर सेलच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन या फोटोंसंदर्भातील इशारा पोलिसांनी दिला आहे. या संदर्भात पोलिसांनी हे तीन ट्विट केले आहेत.

राजीक खान

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

12 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

12 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

13 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

13 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

14 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

16 hours ago