महाराष्ट्र

सुभाष देसाईंनी एमआयडीसीच्या माध्यमातून पुरग्रस्तांना केली मदत

टीम लय भारी

मुंबई:- महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत महापूरामुळे लोकांची अतिशय बिकट परिस्थिती झाली आहे. अशा संकटकालिन परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुढाकार घेतला आहे. सुमारे २५ हजार पूरग्रस्त कुटुंबियांना सुभाष देसाई आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने जीवनावश्यक वस्तुंची मदत रवाना करण्यात आली आहे (Subhash Desai helped the flood victims through MIDC).

या महापुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. हजारो नागरिक बेघर झाले आहेत. नागरिकांचे दैनंदीन जीवन विस्कळीत झाले, अशा आपत्तीग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक मदत मिळावी, यासाठी सुभाष देसाई आणि एमआयडीसीने एक हात मदतीचा पुढे केला आहे (Subhash Desai and MIDC have extended a helping hand).

खासदार किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा दावा, आमदार प्रताप सरनाईक यांनी कायदेशीर दंड थोपटले

मुंबईतही चालते सावकारी, गिरगावातील सावकराच्या घरी टाकली धाड

महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राला पडला आहे. या पूरग्रस्त भागांतील नागरिकांना देसाई आणि एमआयडीसीद्वारे अन्नधान्यांचे वाटप केले जात आहे. यामध्ये राशन, चादरी, बेडशिट, टॉवेल, अन्नपदार्थ आदीचा समावेश आहे. याशिवाय पाच ट्रकद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्यात येत आहे. असे सुभाष देसाई यांनी सांगितले.

पूरग्रस्तांना मदतीचा जीवनाश्यक वस्तू

एमआयडीसीच्या कार्यालयातून राज्यातील ठिकठिकाणी ही मदत पूरग्रस्त भागांकडे पाठविण्यात आली आहे. ठाणे, डोंबिवली, पुणे, औरंगाबाद, नाशिक आदी प्रादेशिक कार्यालयांकडून ही मदत देण्यात आली. ठाणे, डोंबिवली एमआयडीसीकडून १००० राशनचे पाकिटे( २५ हजार किलो), २००० पाण्याच्या बाटल्या, ५५०० बँकेट्स, ५५०० टॉवेल्स पाठविण्यात आले तर औरंगाबादमधून ५०० अन्नधान्यांची पाकिटे पाठविण्यात आली आहेत. तसेच ज्या गावांना एमआयडीसीद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे, तेथील बिघाड दुरुस्त करण्यात आले, असून काही ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली आहे.

बैल मुततो तशा मी भूमिका बदलत नाही: राज ठाकरे

maharashtra: Navy’s flood rescue teams help locals with food, medicine

कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रावर पुरामुळे मोठे संकट कोसळले आहे. येथील सुमारे २५ हजार कुटुंबियांना देसाई आणि एमआयडीसीच्यावतीने मदत केली जात आहे. पुढील दोन दिवसांत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जाणार आहे. शासन संकट काळात पूरग्रस्तांच्या मागे खंबीरपणे उभी असल्याची भावना देसाई यांनी व्यक्त केली आहे (Subhash Desai said, the government stands firmly behind the flood victims in times of crisis).

Sagar Gaikwad

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

9 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

10 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

11 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

12 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

12 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

12 hours ago