34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयबैल मुततो तशा मी भूमिका बदलत नाही: राज ठाकरे

बैल मुततो तशा मी भूमिका बदलत नाही: राज ठाकरे

टीम लय भारी

मुंबई:- आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसेने कंबर कसली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी आपण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्या नसल्याचा दावा केला आहे. तसेच माझे मत स्पष्ट असते. बैल मुततो तशा मी भूमिका बदलत नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे (Raj Thackeray said, I don’t change my role like a bull).

राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याने दोन्ही पक्षाची युती होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, राज ठाकरे यांनी आपण चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याच नसल्याचा दावा केला आहे.

संजय राऊत यांचा पुन्हा एकदा ‘या’ प्रकरणावरून मोदी सरकारवर हल्लाबोल

मी आणि मुख्यमंत्री मित्र आहोत! देवेंद्र फडणवीसांचं प्रांजळ उत्तर

राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना 100 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर राज यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली, भाजपसोबत मनसेची युती होणार आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. तुम्हीच प्रश्न निर्माण करता आणि आम्हाला उत्तर विचारता. मी चंद्रकांत पाटील यांना क्लिप पाठवली नाही, मी बोललो होतो क्लिप पाठवेल. त्यांना कोणी पाठवल्या माहीत नाही, त्यांना याबाबत विचारणार आहे. माझे भाषण हिंदीत होते, ते हिंदी भाषिकांना आवडले. तुम्हाला कळले नसले तर तुम्हाला पाठवतो. असे मी चंद्रकांत पाटील यांना म्हणालो होतो. त्यावर, मला पाठव, मला नक्की ऐकायला आवडेल, असे ते म्हणाले होते. त्यानंतर मुंबईत आल्यावर मी एक-दोन जणांशी याबाबत बोललो होतो. त्यापैकी एकाने पाठवली असेल की नाही ते विचारतो, असे राज ठाकरे म्हणाले (Raj Thackeray said I had said he would send the clip to Chandrakant Patil. But don’t know who sent them).

Raj Thackeray said, I will not change my role like
मनसे अध्यक्ष राज ठाकरे

परप्रांतियांबाबतची माझी भूमिका स्पष्ट आहे

राज ठाकरे यांनी परप्रांतियांबाबतची भूमिका स्पष्ट केली, तर आम्ही युतीबाबत विचार करू, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्याबाबत राज यांना विचारण्यात आलं. त्यावर, भूमिका क्लिअर काय करायच्या, माझ्या भूमिका क्लिअर आहेत. माझ्या भाषणात बैल मुतल्यासारखा मी विचार नाही करत. बैल उभ्या उभ्या चालता चालता मुततो. तसा विचार मी करत नाही , माझ्या भूमिका आजपर्यंत मांडल्या त्या अत्यंत स्पष्ट आहेत. त्या देश हिताच्या आहेत आणि महाराष्ट्र हिताच्या आहेत. त्यात प्रत्येक राज्यांनी आपली भूमिका कशी निभावली पाहिजेत. काय काय गोष्टी केल्या पाहिजेत, तुम्ही आमच्यावर आक्रमण करू नका. आम्ही तुमच्यावर आक्रमण करणार नाही. आसाम आणि मिझोराममध्ये सध्या तेच होत आहे, असे राज ठाकरे म्हणाले (Raj Thackeray clarified the role of foreigners).

अमोल कोल्हे म्हणतात, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व केले, तर अभिमान असेल पण….

Raj Thackeray takes a dig at Raj Kundra after latter is arrested in pornography case

Raj Thackeray said, I will not change my role like
मनसे अध्यक्ष राज ठाकरे

माझा विरोध भूमिकांना, व्यक्तिला नाही

माझा भूमिकांना विरोध असतो, व्यक्तीला नाही. हे मी अनेकदा स्पष्ट केलं आहे. मोदी असतील किंवा अमित शहा असेल यांच्याशी माझे वैयक्तिक देणघेणे नाही. ज्या भूमिका पटल्या नाहीत त्याला विरोध केला आणि ज्या पटल्या त्याचे जाहीर अभिनंदनही केले आहे. त्याचे समर्थनही केले, त्या समर्थनासाठी मोर्चाही काढला आहे. जे पटत नाही ते पटत नाही सांगणे महत्त्वाचे आहे. या सर्व गोष्टीसाठी छक्केपंजे करू का?, असे राज ठाकरे म्हणाले आहेत (Raj Thackeray said, I am opposed to the role, not to the individual).

जो टार्गेट करेल त्याला टार्गेट करणार

महापालिका निवडणुकीत तुम्ही कुणाला टार्गेट करणार असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावेळी जो आम्हाला टार्गेट करत असेल त्याच्यावर टार्गेट करणार, असे उत्तर राज ठाकरे यांनी दिले आहे (Raj Thackeray said, whoever targets will be targeted).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी