महाराष्ट्र

आम्हाला मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय, ‘आपल्यासाठी संभाजीनगरच’ : संजय राऊत

टीम लय भारी

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत नामांतराचा मुद्दा उफाळून येण्याची चिन्हं आहेत. भाजपाकडून वारंवार नामांतराची केली जाणारी मागणी आणि काँग्रेसकडून होणारा विरोध अशा दुहेरी कोंडीत शिवसेना अडकल्याचं चित्र आहे. औरंगाबादच्या नामांतराबद्दल शिवसेनेकडून सातत्यानं भूमिका मांडली जात आहे. “आमच्यासाठी औरंगाबाद नाही, तर संभाजीनगरच आहे, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोर देऊन सांगितलं आहे.

औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावर बोलताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले,”महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की, आपल्यासाठी औरंगाबाद नव्हे, तर संभाजीनगरच आहे आणि संभाजीनगरच राहणार. हा लोकांच्या भावनेचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण चर्चा करू शकतो, पण निर्णय घेण्यात आला आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याच्या मागणीनं पुन्हा एकदा जोर धरला आहे. औरंगाबाद महापालिकेची चाहूल लागल्यानं हा मुद्दा ऐरणीवर आला असून, भाजपाकडूनही या मुद्द्यावरून शिवसेनेची कोंडी करण्याचे प्रयत्न केले जात आहे.

नामांतराला विरोध असलेल्या काँग्रेसला संजय राऊत यांनी रोखठोक सदरातूनही चिमटे काढले आहेत. “महाराष्ट्रातील सर्वच पुढाऱ्यांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचायला हवा. निदान आपल्या बालपणातील इतिहासाची शालेय क्रमिक पुस्तके तरी नजरेखालून घालायला हवीत. औरंगजेब हा ‘सेक्युलर’ वगैरे कधीच नव्हता. त्याला इस्लाम धर्माधिष्ठत राज्यविस्तार करायचा होता. औरंगजेबाची धर्मांधता म्हणजे आदर्श राज्यव्यवस्था होऊ शकत नाही. त्याने राज्यविस्तारासाठी निर्घृण मार्गाचाच अवलंब केला. त्याने धर्माचेच राजकारण केले. जे मुसलमान नाहीत अशा काफीर लोकांना मारण्याकरिता जिहाद पुकारणे, रक्तपात करणे ही गोष्ट इस्लामी धर्माच्या विरुद्ध नाही असे औरंगजेब मानी व तो ते अमलात आणी. त्याने शिवाजीराजांना शत्रू मानलेच, पण छत्रपती संभाजींना हाल हाल करून मारले. असा औरंगजेब संभाजी राजांच्या बलिदानानंतरही पंचवीस वर्षे महाराष्ट्राशी लढत राहिला व शेवटी याच मातीत गाडला गेला. अशा औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचे भान; पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे!,” असं म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरीत्या कांग्रेसला टोले लगावले आहेत.

अभिषेक सावंत

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

9 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

11 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

12 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

13 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

13 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

14 hours ago