महाराष्ट्र

Sharad Pawar | Jaykumar Gore | शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या गावची कहाणी

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(The story of the village adopted by Sharad Pawar). आपण माण – खटावचा विकास केलेला आहे. त्यामुळं विरोधकांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलावं, असं जयकुमार गोरे सतत बोलत असतात. त्या अनुषंगाने लय भारीचे संपादक तुषार खरात वेगवेगळ्या गावांमध्ये फिरत आहेत. तेथील जनतेसोबत संवाद साधत आहेत. जयकुमार गोरे यांनी खरंच विकास केला आहे, का याबाबत सामान्य लोकांशी संवाद साधत आहे. मायणी येथील बाजारात जावून तुषार खरात यांनी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. एका महिला शेतकऱ्यांशी बोलत असताना त्यांनी सरकार शेतकऱ्यांसाठी काहीच बोलत नाही, असं सांगितलं.

Sharad Pawar | Jaykumar Gore यांचा शेजारी म्हणतो, शेतकऱ्यांसाठी शरद पवार किंग, जयकुमार गोरे पडणार

आम्हाला १५०० रूपयांची गरज नाही. आम्हाला आमच्या शेतमालाला हक्काचा भाव द्या, असं या शेतकरी महिलनं सांगितलं. आमचं गाव एनकूळ आहे. एनकूळमध्ये कॅनॉल आलेला नाही. त्यामुळं उन्हाळ्यात पाणी नसतं. माझी मुलं आमदार जयकुमार गोरे यांचेच कार्यकर्ते आहेत. जयकुमार गोरे गावात येतात. गावटग्यांना भेटतात. मोठमोठ्या माणसांना भेटतात. पण गरीब शेतकऱ्यांना कोणी भेटत नाही, अशी भावना या महिला शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी माण – खटाव मतदारसंघात गुंड पोसले आहेत. विरोधक, पत्रकार, साहित्यिक, अधिकारी वर्ग, सरकारी यंत्रणा यांना धाकात ठेवण्यासाठी जयकुमार गोरे हे सतत आपल्या गुंडांना उत्तेजन देत असतात.

Shahajibapu Patil | Jaykumar Gore | जयकुमार गोरेंचे नाव घेताच शहाजीबापू पाटलांचे समर्थक खवळले

गेल्या आठवडाभरापासून आमदार जयकुमार गोरे यांच्या घोटाळ्यांची, दादागिरीची चिरफाड करणारी बातमीदारी ‘लय भारी’ने आक्रमकपणे केलेली आहे. यात जयकुमार गोरे यांनी माण व खटाव तालुक्यांत कशा पद्धतीने गुंडगिरी जोपासली आहे, याचे वारंवार तपशिल दिलेले आहेत. जयकुमार गोरे यांनी जोपासलेल्या गुंडगिरीचा शुक्रवारी ‘लय भारी’ला प्रत्यय आला. जयकुमार गोरे यांच्या विकासाचा बुरखा फाडणाऱ्या या प्रतिक्रिया ‘लय भारी’ लवकरच प्रसिद्ध करणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाने आमदार जयकुमार गोरे यांची संभावना ‘जनावरांवर भुंकणारा कुत्रा’ अशी केली आहे. ही उपाधी सार्थ ठरविण्याचा चंग जयकुमार गोरे बांधला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणानुसार एखादं कुणी चांगलं काम करीत असेल तर त्याला ते काम करू द्यायचं नाही, त्या व्यक्तीवर कुत्र्यासारखं भुंकायचं, अशी कार्यपद्धतीत जयकुमार गोरे यांची आहे. हे भुंकण्याचं काम जयकुमार गोरे व त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत. जयकुमार गोरे यांच्या या गुंडगिरीला भीक न घालता ‘लय भारी’ने बाजारात सामान्य लोकं व महिलांच्या प्रतिक्रीया घेतल्या.

Jaykumar Gore | ८५ वर्षाच्या निरक्षर आजीने केली इंग्रजीमध्ये स्वाक्षरी | जयकुमार गोरेंचा प्रताप

तुषार खरात

Recent Posts

Eknath Shinde | Devendra Shinde | Jaykumar Gore | सरकार मयतीचे सामान सुद्धा देणार | Ladaki Bahin

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत. गेल्या सलग पाच वेळा ते…

21 mins ago

गर्भधारणेदरम्यान कोणते मीठ अधिक फायदेशीर आहे? जाणून घ्या

प्रत्येक जोडप्यासाठी गर्भधारणा हा एक सुंदर प्रवास असतो. गर्भधारणेच्या 9 महिन्यांच्या चक्रात महिलांच्या शरीरात अनेक…

53 mins ago

Jaykumar Gore | उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी नसते

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे. मीच…

1 hour ago

निरोगी राहण्यासाठी नक्की खा हे सुपरफूड, जाणून घ्या

अन्न हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक अन्नामध्ये विशिष्ट प्रकारचे पोषक घटक आढळतात,…

2 hours ago

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

2 days ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

2 days ago