महाराष्ट्र

ट्रॅव्हल्सला आग, महिलांची धावपळ; बाळासाहेब थोरातांच्या टीमने दुर्घटना टाळली

पावसाची रिमझीम… सायंकाळची ६.३० ची वेळ… राजगुरुनगर/ खेड बायपास मार्गावर टेम्पो ट्रॅव्हल्सच्या इंजिनला अचानक आग लागली… ट्रॅव्हलमध्ये २० ते २५ महिला प्रवाशांची जीव वाचविण्यासाठी धावपळ सुरु असताना माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात श्रीगोंदा अहमदनगरचा दौरा आटोपून मुंबईकडे निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची टीम संगमनेरकडे जात होती… अचानक महिलांचा आवाज आणि ट्रॅव्हल्समधून निघणारे धुराचे लोट पाहुन थोरात यांचे पीए भास्कर खेमनर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली.

बाळासाहेब थोरात यांच्या टीम मधील चालक अरूण जोंधळे, स्वीय सहायक भास्कर खेमनर, विशाल काळे व अंगरक्षक रमेश शिंदे यांनी आमदार थोरात साहेबांच्या गाडीतील सर्व पाण्याच्या बाटल्या घेऊन पेटलेल्या गाडीकडे आग विझविण्यासाठी धाव घेतली. आग विझविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत त्यांनी आग विझवली. यावेळी दोन मुस्लिम बांधवांचीही मोठी मदत झाली, त्यामुळे होणारा मोठा अनर्थ ठळला.

या दरम्यान बायपास हायवेवर अनेक गाड्या ये-जा करत होत्या मात्र एकही गाडी या घटनेकडे पाहून मदतीसाठी थांबत नव्हती. यांचे मनस्वी दु:ख वाटत होते, जेथे अत्यावश्यक मदतीची गरज असेल तिथे आपण सर्वांनीच माणुसकीच्या नात्याने मदत करणे आवश्यक आहे. हा एक नैतिकतेचा भाग आहे. आग लागलेल्या या ट्रॅव्हल मध्ये साधारण 25 ते 30 महिला होत्या, गाडीचे इंजिनची आग विझल्यानंतर सर्व महिलांच्या चेहऱ्यावर आनंदअश्रु दिसून आले व त्यांनी आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या टीमचे आभार व्यक्त केले.

हे सुद्धा वाचा 

धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना लावले ‘कामाला’ 

शरद पवारांकडून नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंचा शेलक्या शब्दांत समाचार   

एकनाथ शिंदे यांच्याकडून बच्चू कडूंसाठी माजी पंतप्रधानांच्या पत्राला केराची टोपली

तालुक्यात बाळासाहेब थोरात असो वा नसो आमदार थोरात यांच्या संस्काराची शिंदोरी, मोलाची शिकवण आणि “लोकांची मदत करणे हे आमच प्रथम कर्तव्य” यांच जाणीवेतून तालुक्यात सर्वजण काम करत असतात. संगमनेर तालुका हा ‘एक परिवार’ असून आमदार थोरात साहेब यांनी नेहमी आदर्श कुटुंबप्रमुखाची भूमिका निभावली आहे. ते सर्वांची काळजी व हित जोपासतात. जनतेच्या सुखदुःखात नेहमी सहभागी असतात. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या याच आदर्श विचारांवर येथील कार्यकर्ते व कार्यालयीन टीम काम करत आहेत. यांचा पुन्हा एकदा प्रत्यय या घटनेतून दिसून आला असून, यांमूळे तात्काळ मदतीने मोठी जीवितहानी ठळली आहे, यांचा मनापासून आनंद वाटत असल्याची भावना थोरात यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली.

आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो. याच जाणीवेतून सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. आज माणसाच्या मदतीला विज्ञान आहे, यंत्रणा आहेत, साहित्यही आहे. मात्र दुसऱ्याला मदत करण्याची भावना लोप पावत चालली आहे. दैनंदिन जीवन जगताना प्रत्येकालाच घाई असते ते मान्य आहे. पण प्रसंग जेव्हा बिकट असतो तेव्हा मदत करावी हीच माफक अपेक्षा, असल्याचे देखील थोरात यांचे सहकारी म्हणाले.

प्रदीप माळी

Recent Posts

आमचं सरकार आलं तर जरांगेंची मराठा आरक्षणची मागणी प्रथम पूर्ण करणार, जयंत पाटील

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकार त्यावर विचार करणार का?…

4 days ago

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची स्ट्रॅटेजी तयार; देवेंद्र फडणवीस

राज्यात भाजपच्या आलेल्या कमी जागा ४८ पैकी ४५ हून अधिकचचा नारा देऊनही केवळ ९ जागांवर…

4 days ago

कामगारांच्या आराेग्यासाठी इएसआयसीला महिन्याला १३ काेटी देऊनही कामगारांचे आराेग्य मात्र अधांतरीच

कामगारांच्या आराेग्यासाठी (workers health) उद्योजकवर्गाकडून इएसआयसीला महिन्याला १३ काेटी अर्थातच वर्षाला १५६ काेटी रूपये देऊनही…

4 days ago

रात्री एक वाजेपर्यत मित्रांसोबत पार्टी करणं महिला डॉक्टरच्या जीवावर बेतलं

मेडिकल कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून पडून महिला डॉक्टरचा मृत्यू (doctor's life) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली…

4 days ago

सातपूर आयटीआयच्या माजी प्राचार्यांचा कारनामा, बनावट बिले सादर करत केला लाखोंचा घोटाळा

सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तत्कालीन प्रभारी प्राचार्याने बनावट बिले सादर करुन लाखोंचा घोटाळा (duped)…

4 days ago

नाशिक येथे स्टॉक, आयपीओ घेण्यास भाग पाडत तरुणांना लाखोंचा गंडा

विविध कंपन्यांचे स्टॉक व आयपीओ घेण्यास भाग पाडून वेगवेगळ्या खात्यांत पैसे जमा करण्यास लावून अज्ञात…

4 days ago