महाराष्ट्र

गोपीचंद पडळकर-अनिल बाबर वादात उदय सामंत यांची उडी

आमदार गोपीचंद पडळकर काय म्हणतात, यापेक्षा देवेंद्र फडणवीस काय म्हणतात याला महत्त्व आहे. आमदार अनिलराव बाबर हेच 2024 ला महायुतीचे उमेदवार असतील, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल बुधवारी झालेल्या सांगली जिल्ह्यातील तामखडी (ता.खानापूर) येथे झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात २०२४ ची खानापूर विधानसभेची निवडणूक एक लाख टक्के आपण लढविणार आहोत आणि जिंकणार आहोत. त्याच्यासाठी काहीही करायला लागले तरी आपली तयारी आहे, असे म्हटले होते.
त्यानंतर मात्र राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीच्या भाजप आणि शिंदे गट यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले होते. काही पत्रकारांनी याबाबत थेट शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांना विचारले असता ते म्हणाले की, अनिल बाबर हे आमचे जेष्ठ सहकारी आहेत.

आमदार गोपीचंद पडळकर काय म्हणतात यापेक्षा देवेंद्र फडणवीस काय म्हणतात हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. खानापूर मतदारसंघातून अनिल बाबर हेच आमचे नेतृत्व करतील आणि फार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असेही मंत्री सामंत यांनी म्हटले आहे.

गोपीचंद पडळकर आता खानापूर (जि. सांगली) मतदार संघातून निवडणुक लढविण्याच्या तयारीत आहेत. खानापूर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर आहेत. सध्या ते एकनाथ शिंदे यांच्या गटात असून तेथे सदाशिव पाटील काँग्रेसचे माजी आमदार देखील याच मतदारसंघातून यापूर्वी निवडून आले होते. सध्या भाजप, शिंदे गट, अजित पवार गट आगामी निवडणुका एकत्र लढण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा 
एअर होस्टेसने असे केले इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांचे स्वागत; व्हिडीओ व्हायरल !
देवेंद्र फडणवीसच सुपर सीएम, एकनाथ शिंदे फक्त चेहरा; नाना पटोलेंची मिश्किल टीका
आम्हाला जीव द्यावा लागला तरी बेहत्तर; मुंबईसाठी जितेंद्र आव्हाड यांचा दिल्लीश्वरांना इशारा

खानापूर तालुक्यातील ऐनवाडी येथे तामखडी ते ऐनवाडी २० लाख रुपयांच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ पडळकर यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना पडळकर म्हणाले, खानापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती 2024 च्या निवडणुकीत बदलायची आहे. त्यामुळे 100 टक्के ताकदीने विधानसभेची निवडणूक लढवायची आहे. 2024 ची विधानसभा निवडणूक खानापूर विधानसभा मतदारसंघातून लढविण्याची घोषणा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते.

प्रताप मेटकरी, विटा

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

19 mins ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

2 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

2 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

3 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

3 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

3 hours ago