महाराष्ट्र

कोरोनाच्या भीषण परिस्थितीत विराट-अनुष्काने उचललं मोठं पाऊल!

टीम लय भारी

मुंबई :- संपूर्ण देशात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव झपाटयाने वाढत आहे. कोरोना  (Corona) रुग्णांमध्ये प्रत्येक दिवशी लक्षणीय वाढ होतेय. दिवसेंदिवस परिस्थिती अधिक बिकट होते आहे. या परिस्थितीत आरोग्याच्या सुविधा देखील अपुऱ्या पडत आहेत. अशा या कोरोनाच्या भीषण परिस्थितीत विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी मोठे पाऊल उचले आहे (Virat Kohli and Anushka Sharma have taken a big step in the dire situation of Corona).

काही रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता जाणवतीय तर कुठे बेड मिळेत नाहीत. अशा सगळ्या कठीण प्रसंगी अनेकजण आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करत आहेत. आयपीएल स्थगित झाल्यानंतर घरी परतलेल्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या जोडीने कोरोना (Corona) लढ्यात ताकदीने सहभाग घेतला. या लढ्याअंतर्गत त्यांनी भरघोस निधीही दिला आहे. विराट अनुष्का जोडीने 2 कोटी रुपयांची मदत कोरोनाविरोधी लढ्यासाठी दिली आहे (The Virat Anushka duo has donated Rs 2 crore for the fight against Corona).

मराठा आरक्षण रद्द केल्याने भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आक्रमक

राहुल गांधीनी पंतप्रधान मोंदींना लिहिले पत्र, मांडला महत्त्वाचा मुद्दा

Watch: Virat Kohli and Anushka Sharma start fundraiser for Covid-19 relief

केट्टोसोबत विराट अनुष्का, राबवणार विशेष मोहिम

क्राऊड फंडिंग अँड मेडिकल फंड रेसिंग इन इंडिया अर्थात केट्टोसोबत विराट-अनुष्का (Virat-Anushka) जोडी #InThisTogether या मोहिमेद्वारे कोरोनाविरोधी (Corona) लढ्यासाठी निधी गोळा करणार आहे. सोशल मीडियावरुन एका व्हिडीओद्वारे या जोडीने याबद्दलची माहिती दिली आहे.

विराट अनुष्काची 2 कोटींची मदत

या मोहिमेच्या द्वारे जमा झालेली रक्कम ते कोरोना (Corona) विरोधी लढ्यासाठी देणार आहेत. हे दोघे फक्त आवाहनच करुन थांबले नाहीत तर त्यांनी भरघोस हाताने मदतीही केली आहे. दोन कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा विराट-अनुष्काने (Virat-Anushka) केली आहे.

विराट अनुष्का व्हिडीओमधून काय सांगतायत?

भारत सध्या कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेशी मुकाबला करतो आहे. देशातल्या आरोग्य व्यवस्थेवर ताण आहे, तिच्यासमोर काही आव्हाने आहेत. ज्या परिस्थितीतून लोक जात आहे ते पाहून माझे हृदय तुटतेय. त्याचमुळे विराट आणि मी केट्टोबरोबर #InThisTogether या मोहिमेद्वारे मदत निधी गोळा करणार आहे, आणि जमा झालेला निधी कोरोनाविरोधी लढ्यासाठी देणार आहोत, असे विराट-अनुष्काने (Virat-Anushka) केलेल्या ट्विटमध्ये सांगितले आहे.

पठाण बंधूंकडूनही मदतीचा हात, कोरोनाग्रस्तांसाठी मोफत भोजन

राजधानी नवी दिल्लीत कोरोना (Corona) लाटेचा दुसरा प्रभाव सर्वाधिक जाणवत आहे. दिल्लीत दररोज नव्या कोरोनाग्रस्तांची लक्षणीय भर पडत आहे. त्यामुळे दिल्लीच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत आहे. तसेच रुग्णांनाही त्रासाला आणि मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने सांगितले की, आमची अकादमी दक्षिण दिल्लीतील कोरोनाग्रस्तांसाठी मोफत भोजन देईल.

“कोरोना (Corona) संसर्गाची दुसरी लाट देशभर सुरु आहे आणि अशा परिस्थितीत गरजूंना मदत करणे आपले कर्तव्य आहे. यापासून प्रेरणा घेऊन क्रिकेट अकादमी ऑफ पठाण (CAP) दक्षिण दिल्लीतील गरजूंना मोफत भोजन पुरवेल”, असे इरफान पठाण याने सांगितले.

Rasika Jadhav

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

4 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

5 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

5 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 weeks ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago