खासदार संभाजी छत्रपतींच्या राजीनाम्याने कोणावर परिणाम होणार?; चंद्रकात पाटील

टीम लय भारी

मुंबई :- मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. मराठा समाजाला सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य नाही आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णावर मराठा समाज आणि संभाजी राजे आक्रमक झाले आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजी छत्रपती (MP Sambhaji Chhatrapati) यांनी राजीनामा दिल्यास त्याचा कोणावर परिणाम होणार आहे? हे सरकार कोडगे आहे. त्यांना काही फरक पडणार नाही, अशी विरोधी पक्षनेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे (Leader of Opposition Chandrakant Patil has expressed).

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे मीडियाशी बोलत होते. संभाजीराजेंनी राजीनामा देऊन कोणावर परिणाम होणार आहे? महाराष्ट्रातील सरकार कोडगे आहे. त्यांना काही फरक पडणार नाही, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. तसेच संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांची हेरगिरी सुरू असल्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केला. संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांची हेरगिरी होत असेल तर ही गोष्ट निषेधार्ह आहे. या संदर्भात चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.

केंद्र सरकार डोकं विरोधी पक्षांच्या राज्यांविरोधात वापरण्यापेक्षा लसीसाठी वापरले असते तरं…

ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून फडणवीसांवर छगन भुजबळांची खोचक टीका

Delhi HC quashes termination of Air India pilots, orders reinstatement with pending salaries

ती भेट राजकीय नव्हती

यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. पवार-फडणवीस यांची भेट राजकीय नव्हती. पवारांचे नुकतेच ऑपरेशन झाले आहे. त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी देवेंद्र फडणवीस गेले. त्यात राजकीय काहीच नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या देवेंद्र फडणवीस हे जळगाव दौऱ्यावर आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे जळगावचे ही मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी ते जळगावमध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणाशी केंद्राचा काय संबंध?

ओबीसीच्या आरक्षणाच्या निर्णयात केंद्राचा काय संबंध? या निर्णयाशी केंद्राचा काहीच संबंध नाही. राज्य सरकारने दीड वर्षापासून मागासवर्गीय आयोग नेमला नाही. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण गेले. त्यामुळे सरकारने आधी मागासवर्गीय आयोग नेमावा आणि कोर्टाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) लगावला.

लांडगेंना समज देणार

भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी मुलीच्या लग्नात मिरवणूक काढून गर्दी जमवली. त्यामुळे लांडगे आणि भाजपवर टीका होत आहे. त्यावरही चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. लांडगे यांनी लग्नात मिरवणूक काढणे आणि गर्दी जमवणे चुकीचेच आहे. त्यांना पक्षाकडून समज दिली जाईल, असे चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) स्पष्ट केले.

Rasika Jadhav

Share
Published by
Rasika Jadhav

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

21 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

1 day ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago