मंत्रालय

मंत्रालयातील ‘या’ IAS अधिकाऱ्याने ‘कोरोना’च्या लढाईत उपसले प्रचंड कष्ट, आता झाली बदली

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’च्या लढाईत डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, सरकारी अधिकारी व कर्मचारी, स्वयंसेवी व्यक्ती कष्ट उपसत आहेत. यांच्या सोबतीने मंत्रालयातील एका IAS अधिकाऱ्यानेही गेली चार महिने प्रचंड कष्ट उपसले आहे.

या IAS अधिकाऱ्याची नुकतीच बदली झाली. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी गेले चार महिने केलेल्या कार्याची मंत्रालयात चर्चा सुरू झाली आहे.

या IAS अधिकाऱ्याचे नाव आहे, डॉ. किरण पाटील. मुख्य सचिवांच्या कार्यालयात उप सचिव म्हणून ते कार्यरत होते. त्यांची कालच ( गुरूवारी ) बदली झाली. रायगड जिल्हा परिषदेत मुख्य कार्य अधिकारी म्हणून त्यांची नवनियुक्ती झाली आहे ( IAS Dr. Kiran Patil transferred at Raigad ZP).

साधारण सहा महिन्यांपूर्वी त्यांची IAS म्हणून पदोन्नती झाली होती ( Dr. Kiran Patil promoted as an IAS). त्यानंतर तत्कालिन मुख्य सचिव अजोय महेता यांनी त्यांच्या कार्यालयात पाटील यांना पहिली नियुक्ती दिली.

मुख्य सचिव कार्यालयात रूजू झाल्यानंतर काही दिवसांतच ‘कोरोना’चे राज्यात आगमन झाले. राज्याच्या संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेची भिस्त मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यावर होती. अजोय मेहता यांच्या सोबतीने किरण पाटील यांनी हनुमानाप्रमाणे जबाबदारी पेलली ( IAS kiran Patil work hard in Corona pandemic).

‘कोरोना’ काळात अजोय मेहतांनी केलेल्या कामांबाबत उलटसुलट चर्चा केली गेली. काही आक्षेपही घेतले गेले. पण मेहता यांनी अफाट कष्ट उपसले होते ( IAS Ajoy Mehta’s work in corona pandemic).

पहाटे सहा – सात वाजल्यापासून ते रात्री १० – ११ वाजेपर्यंत मेहता यांनी स्वतःला ‘कोविड’च्या कामात झोकून द्यायचे.

मेहता यांच्या सोबतीला किरण पाटील, दोन स्वीय सहायक व शिपाई असायचे. गेली साडेतीन महिने मुख्य सचिवांचे कार्यालय या पाच लोकांनीच चालवले. राज्याची सगळी प्रशासकीय यंत्रणा ‘कोविड’च्या कामासाठी जुंपण्याचे काम मुख्य सचिवांनी केले. पण त्याचे संनियंत्रण करण्याचे काम किरण पाटील करायचे.

हे सुद्धा वाचा

Breaking : पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS मनिषा म्हैसकरांच्या घरी दोन चिमुकल्या मुली, तरीही अधिकारी म्हणून ‘कोरोना’च्या लढाईत आघाडी

IAS transfers : मुंबई महानगर क्षेत्रात दोन दिवसांत चार महापालिकांमध्ये नवे आयुक्त

Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा निरोप आला, अन् IAS शेखर चन्ने यांनी अडचणीत असलेल्या 9 जणांना घरी पोचविले

माजी IAS नीला सत्यनारायण यांचे ‘कोरोना’मुळे निधन

माजी IAS अधिकाऱ्याने आईच्या पुण्यतिथीच्या खर्चाची रक्कम दिली CM फंडाला

गेल्या चार महिन्यांत लॉकडाऊन, अनलॉक व कोविड संदर्भातील अनेक निर्णय व आदेश मुख्य सचिवांच्या स्वाक्षरीने निघाले आहेत. यातील जवळपास सगळे आदेश डॉ. किरण पाटील यांनी तयार केले होते. एवढेच नव्हे तर, IAS अधिकारी असूनही पाटील यांनी हे सगळे आदेश स्वतः टाईप केले आहेत. त्यांनी तयार केलेल्या आदेशांमध्ये मुख्य सचिवांकडून किरकोळच बदल व्हायचे. इतके अचूक काम पाटील यांनी केले.

‘कोरोना’च्या काळात पाटील यांनी एकही दिवस सुटी घेतली नाही. रविवारच्या दिवशीही ते ‘कोविड’च्या कामातच असायचे. किंबहूना काही आदेश तर त्यांनी रविवारीही जारी केले आहेत. साडेतीन महिने ते दररोज मंत्रालयात यायचे. रविवारी घरूनच ( दिवसभर) काम करायचे. मंत्रालयात येताना ते स्वतः गाडी चालवायचे.

कार्यालयात आल्यानंतर टेबल पुसण्यापासून ते चहाचे कप धुण्यापर्यंत स्वतःची कामे स्वतःच करायचे. मुख्य सचिव अजोय मेहता हे सुद्धा स्वतःची कामे स्वतःच करायचे.

राज्यभरातील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधिकारी व इतर महत्वपूर्ण व्यक्तींसोबत मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या सतत बैठका व्हायच्या. या बैठकांचे नियोजन करणे, कार्यक्रम पत्रिका निश्चित करणे, राज्यभरातील ‘कोविड’च्या कामाचा आढावा घेऊन ती नोट नियमितपणे मेहता यांना द्यायचे काम पाटील यांनी केले.

मंत्रालयातील ‘कोविड’ नियंत्रण कक्षातील अधिकारी, आरोग्य विभागीतील अधिकारी यांच्याकडून सतत माहिती ओघ चालू असायचा. या माहितीचे संकलन करणे, विश्लेषण करणे, त्याचा अन्वयार्थ लावणे, त्या माहितीचे महत्व निश्चित करून ती मुख्य सचिवांना सुबद्धपणे सादर करणे ही कामेही पाटील यांनी केली.

‘कोरोना’च्या काळात रूग्णांची वाढती संख्या, औषधांची कमतरता, रूग्णालयांतील बेड्सची अपुरी संख्या, परराज्यांत जाणारे कामगार, अन्न धान्याचा पुरवठा, कोविड चाचणी केंद्रांची वाढती आवश्यकता… अशा एक ना अनेक समस्या निर्माण व्हायच्या. या समस्या ज्या खात्यांशी निगडीत आहेत, त्या खात्यांच्या प्रधान सचिवांसोबत समन्वय साधून त्याचा निपटारा करण्यात पाटील दररोज व्यस्त असायचे.

‘कोविड’ काळात आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, महसूल, आपत्ती व्यवस्थापन, मुख्यमंत्री कार्यालय, अन्न व नागरी पुरवठा विभाग, शालेय शिक्षण, उच्च – तंत्र शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, उद्योग, गृह या खात्यांमार्फत अनेक निर्णय घ्यावे लागले होते.

या खात्यांतील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत पाटील नियमितपणे संपर्कात असायचे. त्यांच्यासोबत सतत माहितींची देवाण घेवाण केली जायची.

मुख्य सचिव अजोय मेहता पंधरवड्यापूर्वी निवृत्त झाले. त्यानंतर आता डॉ. किरण पाटील यांचीही बदली झाली आहे. ‘कोविड’ नियंत्रण कार्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा आता चांगली रूळली आहे. कामाची घडी बसलेली आहे. परंतु ही घडी बसविण्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, आरोग्य मंत्री यांच्यासह अनेकांचे मोठे योगदान आहे. त्यात किरण पाटील यांचाही समावेश आहे. पाटील यांनी पडद्याआडून केलेल्या काबाडकष्टाबद्दल मंत्रालयात कौतुक केले जात आहे.

तुषार खरात

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

7 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

7 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

9 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

12 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

12 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

15 hours ago