33 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजमाजी IAS अधिकाऱ्याने आईच्या पुण्यतिथीच्या खर्चाची रक्कम दिली CM फंडाला

माजी IAS अधिकाऱ्याने आईच्या पुण्यतिथीच्या खर्चाची रक्कम दिली CM फंडाला

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’ आपत्तीमुळे राज्य संकटात सापडले आहे. या लढाईमध्ये अनेकजण आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करीत आहेत. एक माजी IAS अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांनीही मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केली आहे.

आपल्या आईंचा पुण्यतिथीचा कार्यक्रम रद्द करून 1 लाख रुपयांची मदत सीएम फंडाला देण्यात आली आहे. तानाजी सत्रे असे या IAS अधिकाऱ्यांचे नाव आहे.

IAS
रामचंद्र सत्रे यांनी 1 लाख रुपयांचा धनादेश मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला

‘लॉकडाऊन’मुळे सध्या सगळेच व्यवहार बंद आहेत. लोकांना कोणतेही कार्यक्रम घेता येत नाहीत. आज ( ता. 24 मे ) IAS सत्रे यांच्या आईंची पुण्यतिथी होती. परंतु ‘लॉकडाऊन’मुळे पुण्यतिथीचा कार्यक्रम घेता आला नाही. त्यामुळे सत्रे कुटुंबियांनी 1 लाख रूपयांची मदत सीएम फंडाला दिली.

IAS तानाजी सत्रे यांचे बंधू रामचंद्र सत्रे यांनी एक लाख रुपयांचा धनादेश आज सकाळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला.

अशिक्षीत असूनही आईंनी मुलांना शिकविले

सत्रे यांच्या आई अनुसया विठ्ठल सत्रे या अशिक्षीत होत्या. त्यांना सात मुले होती. स्वतः अशिक्षीत असूनही त्यांनी मुलांना शिकविले. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात सत्रेवाडी हे त्यांचे गाव.

Mahavikas Aghadi

डोंगराळ भागात असलेले हे गाव अतिशय दुर्गम भागात आहे. इथे सदैव दुष्काळ असतो. तरीही आईंनी आपल्या मुलांना शिकविले. त्यातून तानाजी सत्रे हे IAS झाले. रामचंद्र सत्रे व्यावसायिक झाले. अन्य सगळ्या भावांनीही विविध क्षेत्रांत प्रगती केली.

आईंचे निधन 24 मे 2013 रोजी झाले होते. तेव्हापासून दरवर्षी सत्रे कुटुंबिय गावी पुण्यतिथीचा कार्यक्रम घेतात. पण यंदा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. आता आम्ही प्रत्येक वर्षी कार्यक्रम घेण्याऐवजी ती रक्कम सामाजिक कार्यासाठी देणार असल्याचे रामचंद्र सत्रे यांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

हे सुद्धा वाचा

Lockdown : संकटात राजकारणापेक्षा जबाबदारी आणि जनहित महत्वाचे

जीप चालकाकडून मुंबईच्या “त्या” कुटुंबीयांची फसवणूक, दोन दिवसापासून अडकले…!

Socialwork : पत्रकाराच्या सतर्कतेमुळे जालना जिल्ह्यातील मजूरांची २०० किलोमीटरची पायपीट थांबली

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी