मंत्रालय

CoronaVirus : मंत्री, आमदारांसह सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 25 ते 60 टक्के कपात

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे  ( CoronaVirus ) निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमजार तसेच स्थानिक स्वराज संस्थांचे सदस्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात 60 टक्के कपात करण्यात आली आहे. राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या वेतनातही 50 टक्के कपात करण्यात आली असून त्यांना निम्मे वेतन देण्यात येणार आहे. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के वेतन मिळेल. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. राज्य शासकीय अधिकारी – कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे.  उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.

‘कोरोना’चे ( CoronaVirus ) संकट आणि ‘टाळेबंदी’मुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेली घट लक्षात घेऊन तसेच ‘कोरोना’विरुद्धच्या ( CoronaVirus ) लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे तसेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य तसेच राज्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी या निर्णयाला पाठिंबा, सहकार्य देतील, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

Lockdown21 : ‘बेस्ट’चा अजब कारभार, बिनकामाच्या प्रवाशांसाठी बसेस; कर्मचाऱ्यांना काम नसतानाही उपस्थितीची सक्ती

Lockdown : माजी अधिकाऱ्याचे पोलीस बांधवांना पत्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केलेली जनजागृती

तुषार खरात

View Comments

  • सरकारी कर्मचा-यांच्या वेतन कपातीचा निर्णय दूर्देवी. यामुळे वर्ग 3 संवर्गातल्या आणि कुटुंबात एकच व्यक्ति कमावती असलेल्या कर्मचा-यांवर कोरोनापेक्षाही भयंकर आर्थिक संकट. कर्जाचे हप्ते, मुलांच्या शिक्षण / उच्च शिक्षणाचे शुल्क , घरातल्या जेष्ठांवरील औषधपाण्यावरील खर्च त्यामध्ये जर सरकार अशी एकतर्फी पगार कपात करत असेल तर प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणा-या वर्ग 3 कर्मचा-याला आर्थिक संकटात टाकल्यासारखे आहे. सरकारने वर्ग 3 ची पगार कपात मागे घेऊन कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री मदत निधीसाठी एक दिवसाचे वेतन कपातीस वर्ग 3:च्या कर्मचा-यांची हरकत नाही. सरकारने 50% व 25 % पगार कपातीचा निर्णय मागे घ्यावा. यासाठी मा. मुख्यमंत्री व मा. वित्त मंत्री यांची लाॅकडाऊन संपताच प्रत्यक्ष भेट घेऊन विनंती करणार.

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

5 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

6 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

9 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

9 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

9 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

10 hours ago