31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमंत्रालयCoronaVirus : मंत्री, आमदारांसह सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 25 ते 60 टक्के कपात

CoronaVirus : मंत्री, आमदारांसह सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 25 ते 60 टक्के कपात

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे  ( CoronaVirus ) निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमजार तसेच स्थानिक स्वराज संस्थांचे सदस्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात 60 टक्के कपात करण्यात आली आहे. राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या वेतनातही 50 टक्के कपात करण्यात आली असून त्यांना निम्मे वेतन देण्यात येणार आहे. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के वेतन मिळेल. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. राज्य शासकीय अधिकारी – कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे.  उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.

‘कोरोना’चे ( CoronaVirus ) संकट आणि ‘टाळेबंदी’मुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेली घट लक्षात घेऊन तसेच ‘कोरोना’विरुद्धच्या ( CoronaVirus ) लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे तसेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य तसेच राज्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी या निर्णयाला पाठिंबा, सहकार्य देतील, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

Lockdown21 : ‘बेस्ट’चा अजब कारभार, बिनकामाच्या प्रवाशांसाठी बसेस; कर्मचाऱ्यांना काम नसतानाही उपस्थितीची सक्ती

Lockdown : माजी अधिकाऱ्याचे पोलीस बांधवांना पत्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केलेली जनजागृती

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी