सिनेमा

आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कस्टडी

टीम लय भारी

मुंबई : बॉलिवुड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबईच्या किला कोर्टाने येत्या ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटच्या लिंक्स आढळून आल्यानेच आम्हाला आर्यनच्या चौकशीसाठी त्याची कोठडी हवा असल्याचा युक्तीवाद नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या वतीने करण्यात आला. (Aryan Khan in NCB custody till October 7)

आर्यनसह मुनमुन आणि अरबज यांनाही आज कोर्टात दाखल करण्यात आले होते. या दोघांनाही ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे.

केंद्रातील मोदी व उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा : नाना पटोले

जाणून घ्या बडीशेपचे आरोग्यगायी फायदे, बनवा बडीशेप फ्लेवरचा ग्रीन टी घरच्याघरी

एकुण आठ जणांना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. एनसीबीने  कार्डेलिया क्रूझवर एनसीबीने टाकलेल्या धाडीनंतर आज एनसीबीने कोर्टाकडे १३ ऑक्टोबरपर्यंत कस्टडीची मागणी केली होती. एनसीबीने या प्रकरणात आतापर्यंत ९ जणांना अटक केली आहे.

संपुर्ण प्रकरणात अनेक संशयित आरोपी आहेत ज्यांची अजून ओळख पटावयाची आहे व त्यासाठी चौकशी गरजेची आहे. आर्यन खान हा पेमेंट करण्यासाठी ते कशाच्या माध्यमातून करायचं हे विचारताना दिसतोय. तसेच संपुर्ण संभाषणात बऱ्याच कोडवर्डचा वापर यात करण्यात आला आहे.

आम्ही आरोपींच्या चौकशीदरम्यान जुहूमधील 9 व्या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केले, अशीही माहिती एनसीबीने कोर्टात दिली.

संपुर्ण ड्रग्ज प्रकरणात या आरोपींवर जामीन मिळणारे असे सेक्शन जरी लावलेले असले, तरीही मुंबई हायकोर्टात सुनावणी झालेली तीन उदाहरण समोर आहेत ज्यामध्ये NDPS ऍक्टमधील प्रकरणात अर्ज नाकारण्यात आला होता, असे एनसीबीकडून एएसजी अनिल सिंह यांच्याकडून सांगण्यात आले. अनिल सिंग यांनी रिया चक्रावर्तीची ऑर्डर वाचून दाखवली. या प्रकरणात रियाला जामीन नाकारण्यात आला होता. रिया चक्रवर्तीच्या प्रकरणात  NDPS ऍक्टमधील सेक्शनमध्ये जामीन नाकारण्यात आला होता.

तर आम्ही समाजाला ड्रग्समुक्त बनवण्याची मोहीम राबवतोय त्यामुळे तुमच्याकडे कमी प्रमाणात ड्रग्स सापडलं याचा अर्थ तुम्हाला बेल मिळावी असे तुम्ही म्हणू शकत नाही, असा एनसीबीच्या वकिलांनी कोर्टात दावा केला आहे.

kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रनौतला या मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी?

Shah Rukh Khan’s son Aryan Khan arrest LIVE Updates: Aryan Khan, Arbaaz Merchant being grilled together by NCB

मुंबई हायकोर्टातील एका निकालाचा संदर्भ आर्यन खानसाठी सतीश मानेशिंदे यांनी दिला. सोहेल खान विरुद्ध राज्य सरकार सूनवणीचा संदर्भ त्यांनी दिला. मानेशिंदे यांच्याकडून स्टेफन मुल्लाच्या केसचाही कोर्टात संदर्भ देण्यात आला. आता रियाच्या जजमेंटवर बोलताना तिच्यावर आरोप होता की ड्रग्ससाठी तिने पैसे पुरवले आणि ड्रग्सच्या अधीन नेलं. इथे आर्यन खानवर तसा आरोप नाहीये, असेही मानेशिंदे म्हणाले. तसेच मानेशिंदे अलाहाबाद कोर्टातील तिसरे जजमेंट वाचून दाखवले.

व्हाट्सए चॅट माझ्या कस्टडीसाठी पुरेसे नाहीत. माझ्याकडे काही सापडलं आहे का ? किंवा इतर गोष्टींचाही विचार करावा. आर्यन खान आणि अरबाझ मर्चंट एकत्र होते याचा अर्थ त्याच्यात साम्य आहे असं नाही, असेही मानेशिंदे यांनी कोर्टासमोर स्पष्ट केले. तीन आरोपीमध्ये फक्त 5 ग्रॅम चरस सापडलं, तरीही कोकेन एमडीएमए असा उल्लेख एनसीबीने अटकेवेळी केलाय असेही मानेशिंदे म्हणाले. कोणाकडून काय ड्रग्स सापडलं याची माहिती एनसीबीने दिली नाही.

Mruga Vartak

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago