28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयkangana Ranaut : अभिनेत्री कंगना रनौतला या मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी?

kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रनौतला या मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी?

टीम लय भारी

शिमला : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतला लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी सीटवर लोकसभेच्या होणाऱ्या पोटनिवडणुकीत कंगनाला उमेदवारी मिळू शकते. भाजप खासदार रामस्वरूप शर्मा यांचे मार्चमध्ये निधन झाले होते. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती (Kangana Ranaut likely to get Lok Sabha candidature).

 मंडी लोकसभा जागेबरोबरच तीन विधानसभा जागांसाठी ३० ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहेत. तसेच भाजप निवडणूक समिती हिमाचल प्रदेशच्या पोटनिवडणुकीसाठी धर्मशाळेत बैठक घेणार आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या एका वर्गाला मंडी सीटचे तिकीट कंगना रनौतला द्यायचे आहे. मात्र कंगनाने अद्याप निवडणूक लढवण्याची इच्छा उघडपणे सांगितलेली नाही.

Weight Loss | वजन कमी करायचेय? मग ‘या’ गोष्टींचे करा सेवन

जाणून घ्या, काय आहेत देशी तुपाचे फायदे

कंगना रनौत ही मंडी जिल्ह्यातील भांबला गावची आहे आणि तिने आपले नवीन घर मनालीमध्ये बांधले आहे, जे मंडी लोकसभा मतदारसंघात येते. मंडीबरोबरच हिमाचलमधील फतेहपूर, जुबल कोथकाई आणि आर्की विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. या वर्षी माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या निधनानंतर आर्की जागा रिक्त आहे. उर्वरित दोन जागाही येथे विजयी झालेल्या उमेदवारांच्या मृत्यूनंतर रिक्त झाल्या आहेत.

WhatsApp चॅट तुम्ही लपवू शकता, ही सोपी ट्रिक माहित आहे का?

IS THIS ‘STAR’ THE REASON BEHIND SAM-CHAY SEPARATION? KANGANA RANAUT’S SHOCKING POST GRABS ATTENTION!!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी