सिनेमा

Kareena Kapoor : ‘बेबो’ करीनानं शेअर केला खास फोटो ! दाखवलं ‘बेबी बंप’

टीम लय भारी

मुंबई : बॉलिवूड स्टार करीना कपूर (Kareena Kapoor) आणि तिचा पती अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या घरी आता नवा पाहुण येणार आहे. सैफ आणि करीना दुसऱ्यांदा आईबाबा होणार आहेत. लवकरच तैमूर अली खानला (Taimur Ali Khan) भावंड मिळणार आहे. सध्या करीना तिचा प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करत आहे. या काळात ती सोशलवर अ‍ॅक्टीव्ह दिसत आहे. 2021 मध्ये ती आई होणार आहे. सध्या आपल्या फोटोमुळं करीना चर्चेत आली आहे.

करीनानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात सेल्फीमध्ये करीना तिचं बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. तिचे हावभाव देखील पाहण्या सारखे आहेत. यावेळी करीना नो मेकअप लुकमध्ये दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं स्पोर्ट ब्रा घातली आहे.

करीनाचा हा फोटो समोर आल्यानंतर लोकांनी लाईक्स आणि कमेंट करायला सुरुवात केली. काहींना करीनाचा हा लुक खूप आवडला आहे. सध्या तिचा हा फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा 13 मार्च 2020 रोजी रिलीज झाला होता. लवकरच ती करण जोहरच्या तख्त या मल्टीस्टारर सिनेमातही काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज होणार आहे. करीनाकडे लाल सिंह चड्ढा हा सिनेमाही आहे. या सिनेमात ती आमिर खानसोबत काम करणार आहे. पुढील वर्षी ख्रिसमसला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

11 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

12 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

13 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

13 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

13 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

15 hours ago