सिनेमा

शिल्पा शेट्टीचाही पतीसोबत सहभाग आहे का?; पोलीसांनी केली सहा तास चौकशी

टीम लय भारी

मुंबई :- पोर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेला बिझनेसमन राज कुंद्राची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीची पोलीसांनी शुक्रवारी सायंकाळी चौकशी केली. शिल्पा शेट्टीचाही पॉर्न फिल्म्स प्रकरणात सहभाग आहे का? यासाठी पोलीसांनी शिल्पा शेट्टीची सहा तास चौकशी केली (Police questioned Shilpa Shetty for six hours).

मुंबई पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी शिल्पा शेट्टीच्या जुहू येथील बंगल्याची झाडाझडती घेतली. तसेच शिल्पाची सहा तास चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिल्पा शेट्टीचाही porn films प्रकरणात सहभाग आहे का? शिल्पाला यातून आर्थिक लाभ झाला का? या अनुषंगाने पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.

मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडून पुरग्रस्तांना दिलासा

दुर्गंधी जाईल, इतिहास राहील (डॉ. जितेंद्र आव्हाड)

पॉर्न फिल्म्स निर्मिती आणि प्रदर्शन केल्याप्रकरणात मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा यांना अटक केलेली आहे. या प्रकरणात कुंद्रा यांना 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्वांची पोलिसांकडून चौकशी केली जात असून, राज कुंद्रा यांची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचाही जबाब शुक्रवारी नोंदवण्यात आला (Actress Shilpa Shetty’s reply was also recorded on Friday).

राज कुंद्रा यांचा पॉर्न फिल्म्स निर्मितीशी संबंध असल्याची माहिती शिल्पाला होती का? अटकेत असलेला उद्योजक आणि शिल्पाचा पती राज कुंद्रा यांच्या अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात तिचाही सहभाग आहे का, याची चौकशी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून करण्यात आली. शिल्पाच्या जुहूमधील आलिशान घरात क्राईम ब्रांचने शुक्रवारी संध्याकाळी छापा टाकला. राज कुंद्राला घेऊन मुंबई पोलीस गुन्हे शाखा त्यांच्या घरी गेली होती. शिल्पाचा जबाब आणि धाडसत्र संपल्यानंतर सहा तासांनी पोलिसांचे पथक राज कुंद्रासह घराबाहेर पडले.

‘कोरोना’मुळे विद्यार्थ्यांचा भार हलका, शिक्षणात पंचवीस टक्के कपात; वर्षा गायकवाडांची माहिती

Raj Kundra pornography case live updates: Shilpa Shetty supports her husband, says not involved in making ‘porn’

शिल्पा शेट्टी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पॉर्न फिल्म्स निर्मितीमुळे चर्चेत आलेल्या विआन कंपनीच्या संचालकपदी शिल्पा शेट्टी होती. मात्र, तिने नंतर विआन उद्योगाच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता. विआन कंपनीने निर्मिती आणि विक्री केलेल्या पॉर्न फिल्म्समधून शिल्पा शेट्टीलाहा आर्थिक लाभ झाला का याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

विआन कंपनीच्या संचालक पदावर शिल्पा शेट्टी किती काळ होती? तिला अश्लील चित्रपट निर्मितीबाबत काही कल्पना होती का? या रॅकेटचा कारभार विआन कंपनीच्या ऑफिस मधून चालत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे २०२० मध्ये तिने विआन कंपनीच्या डायरेक्टर पदाचा राजीनामा का दिला होता? या संदर्भात शिल्पाची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे (It has come to light that Shilpa has been interrogated).

पोलिसांकडून शिल्पा शेट्टीच्या बँक खात्यांचाही तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर विआन कंपनीच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आलेले आहेत. ते कुणी डिलीट केले याची चौकशी पोलिसांकडून केली जाणार असल्याचे वृत्त आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

10 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

10 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

11 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

11 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

11 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

13 hours ago