35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeएज्युकेशन'कोरोना'मुळे विद्यार्थ्यांचा भार हलका, शिक्षणात पंचवीस टक्के कपात; वर्षा गायकवाडांची माहिती

‘कोरोना’मुळे विद्यार्थ्यांचा भार हलका, शिक्षणात पंचवीस टक्के कपात; वर्षा गायकवाडांची माहिती

टीम लय भारी

मुंबई:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शाळा प्रत्यक्ष सुरु करणे अवघड आहे. यामुळे शिक्षकांकडून पुन्हा अभ्यासक्रम कपात करण्याची मागणी होती. यावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शैक्षणिक अभ्यासक्रम 25 टक्के कपात केला असल्याची घोषणा केली आहे (Varsha Gaikwad announced educational curriculum reduced).

सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गतवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता इ. 1 ली ते इ. 12 वीपर्यंतचा 25% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे दिली आहे (Varsha Gaikwad has given information through Twitter.)

मुख्यमंत्र्यांची घोषणा; अतिवृष्टीमुळे मृत्यू झालेल्या नातलगांना 5 लाखाची मदत

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आता लष्करालाही केले पाचारण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण पद्धतीमध्ये खूप काही बदल झाले आहेत. कोरोनामुळे महाराष्ट्रातील नव्हे, तर संपूर्ण जगातील विद्यार्थ्याना संकटास सामोरे जावे लागत आहे. राज्यात कोरोना संकटामुळे सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून शिकवण्यात येत आहे. ऑनलाईन शिकवणीमध्ये वेळेचा व्यथ्यय आणि येणाऱ्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांना पुर्ण अभ्यासक्रम शिकवणे अवघड होते. यामुळे वर्षा गायकवाड यांनी मागील वर्षीही २५ टक्के अभ्यासक्रमात कपात करण्यात आला होता.

Varsha Gaikwad announced educational curriculum reduced
वर्षा गायकवाड

कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे यावर्षीही शैक्षणिक वर्ष आँनलाईन पध्दतीने सुरु झाले आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत असल्यामुळे अनेक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांनी शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळेतील अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे.

Varsha Gaikwad announced educational curriculum reduced
२५ टक्के अभ्यासक्रमात कपात केल्याचे आदेश पत्र

महापुराने केले होत्याचे नव्हते; पाहा : काळजाचा ठोका चुकविणारे फोटो

Maharashtra Board Syllabus for Classes 1 to 12 to be reduced by 25%: Varsha Gaikwad

विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन व शिक्षक व पालक संघटनेने केलेल्या मागणीचा विचार करून यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाने 25% अभ्यासक्रम कमी करून विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे (The Department of Education has given a huge relief to the students by reducing the curriculum by 25%.)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी