सिनेमा

एव्हेंजर्स’चे सर्व रेकॉर्ड ब्रेक करत ‘स्पायडरमॅन’ ठरला बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर

टीम लय भारी

मुंबई: भारतातील बडे सुपरस्टार जी कमाल करु शकले नाहीत ती कमाल मार्वेल सिनेमॅटिक युनिवर्सच्या ‘स्पाय़डर मॅन नो वे होम’ चित्रपटाने यावर्षी केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी देशातील कोणत्याही भाषेतील चित्रपटाची सर्वात मोठी ओपनिंग करण्याचा विक्रम केला आहे(Spiderman’ became a blockbuster at the box office)

सध्याच्या आकडेवारीनुसार, ‘स्पाय़डर मॅन नो वे होम’ चित्रपटाच्या कमाईने पहिल्याच दिवशी ३५ कोटींचा आकडा पार केला आहे.

अभिजीत बिचुकले म्हणाला मला गालावर KISS दे…

’83’ Movie | कपिल देव यांनी मदन लाल यांच्या रिव्हेंजची कहाणी केली शेअर

‘स्पाय़डर मॅन नो वे होम’ या चित्रपटाच्या वाढत्या क्रेझमुळे आत्ता दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बहुचर्चित ‘पुष्पा’ चित्रपट अडचणीत सापडला आहे. यातच येत्या दोन शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या ’83’ आणि ‘जर्सी’ या क्रिकेटवर आधारित चित्रपटांमुळेही या अडचणी अधिक वाढल्या आहेत.

‘स्पाय़डर मॅन नो वे होम’ या चित्रपटाने भारतातील चित्रपट व्यवसायाची बाजारपेठ बदलून टाकली आहे. देशात आत्तापर्यंत प्रदर्शित झालेल्या इंग्रजी चित्रपटांपैकी हा चित्रपट सर्वाधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. गुरुवारपर्यंत हा चित्रपट देशातील ३२६४ स्क्रीन्सवर दाखवला जात आहे.

राखी सावंतचा पती रितेशने नॅशनल टेलिव्हिजनवरच केलं कीस!

Spiderman Rocks With Visual Effects, What Next?

रविवारपर्यंत यात सातत्याने वाढ होतेय. यामुळे हिंदी चित्रपट निर्मात्यांची झोप उडाली आहे. गुरुवारीच या चित्रपटाने देशात आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या हॉलिवूड चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईत दुसरा क्रमांक पटकावला.

‘स्पाय़डर मॅन नो वे होम’ हा मार्वेल सिनेमॅटिक युनिवर्सचा २७वा सिनेमा आहे. १६ डिसेंबरला सिनेमा भारतात रिलीज झालाय. तर १७ डिसेंबरला हॉलिवूड आणि अमेरिकेसह जगभरात सिनेमा रिलीज होणार आहे. स्पायडरमॅन वो वे होम हा सिनेमा ‘स्पायडरमॅन: होमकमिंग’ आणि ‘स्पायडरमॅन: फार फ्रॉम होम’ या सीरीजमधील तिसरा सिनेमा आहे.

यापूर्वी देशात प्रदर्शित झालेल्या टॉम हॉलंडच्या स्पायडर मॅन चित्रपटांनीही चांगला व्यवसाय केला होता पण ‘स्पायडरमॅन : नो वे होम’ या चित्रपटाची गोष्ट काही औरच आहे. चार वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘स्पायडरमॅन होमकमिंग’ या चित्रपटाने भारतात पहिल्याच दिवशी ९.३६ कोटींची कमाई केली होती.

त्यानंतर रिलीज झालेला ‘स्पायडरमॅन फार फ्रॉम होम’ हा चित्रपट यापेक्षा चांगली कामगिरी करू शकला नाही. पण ‘स्पिरमन: नो वे होम’ या चित्रपटाने देशात रिलीज झालेल्या हॉलिवूडच्या टॉप 10 ओपनर्समध्ये सलग दुसरी एंट्री घेतली आहे.

भारतात प्रदर्शित झालेल्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये सर्वात मोठी ओपनिंग घेण्याचा विक्रम अजूनही मार्वलच्या ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’कडे आहे, ज्याने रिलीजच्या पहिल्या दिवशी २०१९ मध्ये ५३.१० कोटी रुपये कमावले होते.

‘अ‍ॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर’ या चित्रपटाने वर्षभरापूर्वी बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या पहिल्याच दिवशी ३१.३० कोटी रुपयांची कमाई केली होती. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ‘हॉब्स अँड शॉ’ हा चित्रपट आहे, जो २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याने भारतात १३.१५ कोटींची ओपनिंग केली होती.

टीम लय भारी

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

14 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

14 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

15 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

15 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

15 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

18 hours ago