मुंबई

मुंबई लोकल मध्ये 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार,आरोपी अटकेत

सावित्रीबाई वसतीगृहातील घटना ताजी असतानाच आत्ता मुंबई मध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे. मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्येच मुली सुरक्षित नाहीत. धावत्या लोकल ट्रेनमध्ये एका 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घडना 14 जून रोजी सकाळी 7.28 च्या सुमारास घडली. पीडित तरुणी परीक्षेला जात असताना तिच्या वर हा प्रसंग ओढावला. नवाज करीम (40 वर्ष) अस या आरोपीच नाव असून आरोपी हा रोजंदारी करून स्व:तच पोट भरतो. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पीडित तरुणी ही मुंबई मधील गिरगाव येथील रहिवासी आहे. तरुणी बेलापूर येथे परीक्षेला जात असताना हा प्रकार घडला आहे. सकाळी 7.28 च्या सुमारास तरुणी लोकलच्या सेकंड क्लास डब्यामधून प्रवास करत होती. ट्रेन सुरू होताच आरोपी नवाज करीम महिला डब्यात चढला. तरुणी डब्यात एकटी आहे याचा गैरफायदा घेऊन त्याने तरुणी वर लैंगिक अत्याचार केला. स्वत:चा बचाव करण्यासाठी तरुणीने आरडाओरडा करायला सुरवात केल्यानंतर आरोपीने मस्जिद बंदर स्टेशन वर उतरून तेथून पळ काढला.

हे सुध्दा वाचा:

बिपरजॉय चक्रीवादळाचा गुजरातला धोका, 74 हजार लोकांचे स्थलांतरण

टाळचिपळ्यांच्या गजरात माऊलींची पालखी दिवेघाटाकडे रवाना ;सासवडमध्ये करणार मुक्काम

शिवकृपा पतपेढीवर संस्थापक सहकार परिवर्तन पॅनलचे वर्चस्व

घटनेनंतर तरुणीने रेल्वे सुरक्षा दलाकडे (आरपीएफ) आरोपी विरुद्ध तक्रार दाखल करून त्याच्या वर बलात्काराच्या आरोपासह भारतीय दंड संहितेच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला . आरपीएफ,क्राईम ब्रान्च,जीआरपी ,मुंबई पोलीसांची पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला. मस्जिद स्थानकात बसवलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला घटनेच्या आठ तासानंतर अटक करण्यात आली असून पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे. आरोपीला गुरवारी न्यायालयात हजार करण्यात येणार आहे. या घटणेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे

 

 

मोनाली निचिते

Recent Posts

Eknath Shinde | Ajit Pawar | आताच्या राजकारणात लबाडी, पूर्वीचे राजकारण निष्ठेचे अने प्रामाणिकपणाचे

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(In today's politics lies, earlier politics…

22 mins ago

Eknath Shinde सातारचे, पण स्वत:चीच घरे भरतात | उदयनराजे १५ वर्षात आमच्या गावात आले नाहीत

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath shinde is bad CM). गेल्या…

37 mins ago

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

14 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

15 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

17 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

17 hours ago